LIC एजंटमुळे कुंभमेळ्यातील कोविड चाचणीचा घोटाळा उघडकीस

विपन मित्तल यांच्या मोबाइल फोनवर २२ एप्रिलला एक मेसेज आला.
haridwar kumbh mela
haridwar kumbh melacanva

मोहाली: यावर्षी हरिद्वारमध्ये कुंभमेळा संपन्न झाला. या कुंभमेळ्यादरम्यान अनेकांच्या कोविड चाचण्या करण्यात आल्या. पण हे सर्व सुरु असताना कोविड चाचणीचा एक घोटाळाही (Kumbh Covid test scam) समोर आला आहे. महत्त्वाचं म्हणजे एका LIC एजंटमुळे हा घोटाळ उघडकीस आला. (LIC agents search blew lid off Kumbh Covid test scam)

कसा उघडकीस आला घोटाळा?

पंजाबच्या फरीदकोटमध्ये राहणारे विपन मित्तल यांच्या मोबाइल फोनवर २२ एप्रिलला एक मेसेज आला. त्यामध्ये त्यांच्या कोविड टेस्ट रिपोर्टची लिंक होती. यात मेख अशी होती की, मित्तल यांनी टेस्टिंगसाठी कुठेही आपले स्वॅब दिले नव्हते. आपल्या खासगी डाटाची चोरी झाली असून गैरवापर झाला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मित्तल यांनी शोध सुरु केल्यानंतर आता देशातील एका सर्वात मोठा कोविड घोटाळा समोर आला आहे.

"माझा कोविड टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह होता. पण मी टेस्ट न करताच रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मी जिल्हा यंत्रणेकडे गेलो. पण कोणी माझी दखल घेतली नाही. आरोग्य यंत्रणेचे अधिकारी सुद्धा काय घडलय ते शोधून काढण्यास फार इच्छुक नव्हते. अखेर शेवटचा पर्याय म्हणून मी ICMR कडे ई-मेलच्या माध्यमातून तक्रार केली" असे मित्तल यांनी सांगितले.

ICMR कडून तपास करु असे सांगण्यात आले. पण आठवड्याभरानंतरही त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यावेळी मित्तल यांनी माहिती अधिकाराचा वापर केला व कोविड चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळेची सखोल माहिती मागितली.

haridwar kumbh mela
डॉक्टरनेच महिला सहकाऱ्याचा केला विश्वासघात, मालाडमधील घटना

तपासातून काय समोर आलं?

ICMR ने आपल्या बाजूने तपास सुरु केल्यानंतर मित्तल यांच्या स्वॅबचे नमुने हरिव्दारमध्ये घेण्यात आल्याचे समजले. ICMR मित्तल यांची तक्रार उत्तराखंडच्या आरोग्य विभागाकडे पाठवली. त्यांनी तपास केल्यानंतर असं लक्षात आलं की, हरयाणातील एक एजन्सीने असे एक लाख कोविड टेस्टचे रिपोर्ट बनवले आहेत. मित्तल यांचा रिपोर्ट त्यापैकीच एक आहे. उत्तराखंड उच्च न्यायालयाने हरिद्वारमध्ये दररोज ५० हजार कोविड चाचण्या करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर कुंभमेळ्या दरम्यान १ ते ३० एप्रिल दरम्यान या चाचण्या करण्यात आल्या.

haridwar kumbh mela
लोकल सर्वसामान्यांना बंद पण डब्यात वाढली प्रवाशांची धक्काबुक्की

तपासामध्ये नावं आणि पत्ते बनावट असल्याचं समोर आलं. राजस्थानमधील विद्यार्थी आणि रहिवाशी जे कुंभला गेलेच नव्हते, त्यांना स्वॅब नमुने गोळा करणारे म्हणून दाखवले होते. आठ एजन्सीच्या मदतीने राज्य सरकारने कुंभमेळ्या दरम्यान चार लाख कोविड चाचण्या केल्या. या सर्व एजन्सी आता तपास यंत्रणांच्या रडारवर आल्या आहेत. "मी तक्रार केली, तेव्हा हा इतका मोठा घोटाळ उघड होईल याची कल्पना केली नव्हती. कोणीही अशी अपेक्षा केली नव्हती" असे मित्तल यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com