खूशखबर ! एलआयसीत आहे नोकरीची संधी; भरणार तब्बल एवढ्या जागा

वृत्तसंस्था
Tuesday, 17 September 2019

एलआयसीमध्ये नोकरीची संधी असून एलआयसी जवळपास 8500 जागा भरणार असल्याचे सांगण्यात आले आहे. देशात मंदीचे सावट असतानाच एलआयसीने सर्वांसाठी नोकरीची एक नवी संधी आली आहे. यासाठी एलआयसीकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत.

नवी दिल्ली : एलआयसीमध्ये नोकरीची संधी असून एलआयसी जवळपास 8500 जागा भरणार असल्याचे सांगण्यात आले आहे. देशात मंदीचे सावट असतानाच एलआयसीने सर्वांसाठी नोकरीची एक नवी संधी आली आहे. यासाठी एलआयसीकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत.

लिपिक, सिंगल विन्डो ऑपरेटर, कस्टमर सेर्व्हिसेस एक्सिक्युटीव्ह अशा विविध पदांसाठीची एलआयसीत भरती करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या भागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. एलआयसीच्या 8500 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी एलआयसीच्या अधिकृत या https://www.licindia.in/ संकेतस्थळाला तुम्हाला भेट देऊन रितसर अर्ज करावा लागणार आहे.

पदांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास 17 सप्टेंबर पासून सुरवात होणार आहे. तर ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख  01 ऑक्टोबर आहे. पूर्व परीक्षेची तारीख 15 ऑक्टोबर असून ऑनलाईन परीक्षेची तारीख 21ऑक्टोबर आहे. तर, मुख्य परीक्षेची तारीख कळवण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. अर्जासाठीची एकूण SC/ST/PWD या वर्गाच्या उमेदवारांकरिता 100रुपये फी आहे. तर, अन्य उमेदवारांसाठी 600 रुपये फीस आकारण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: LIC has 8500 job opportunities