लेफ्टनंट जनरल बीएस राजू बनले लष्कराचे नवे उपप्रमुख; 1 मे रोजी स्वीकारणार पदभार I BS Raju | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lieutenant General BS Raju

भारतीय लष्करात उपसेनाप्रमुख म्हणून बीएस राजू यांची नियुक्ती करण्यात आलीय.

लेफ्टनंट जनरल बीएस राजू बनले लष्कराचे नवे उपप्रमुख

लेफ्टनंट जनरल बीएस राजू (Lieutenant General BS Raju) यांची नुकतीच भारतीय लष्करात उपसेनाप्रमुख (Vice Chief of Army Staff) म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. भारतीय सैन्य दलानं ट्विटव्दारे ही माहिती दिलीय. लष्कराचे प्रमुख जनरल मनोज मोहन नरवणे यांच्याकडून त्यांच्या या नियुक्तीबद्दल अभिनंदन करण्यात आलंय. लेफ्टनंट जनरल बीएस राजू हे 1 मे रोजी आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार असल्याची माहितीही सैन्य दलाकडून देण्यात आलीय.

लष्करात (Indian Army) उपसेनाप्रमुख म्हणून बीएस राजू यांची नियुक्ती करण्यात आलीय. त्यांचं नाव लेफ्टनंट जनरल बग्गावल्ली सोमशेकर राजू (Baggavalli Somashekar Raju) असं आहे. 19 ऑक्टोबर 1963 रोजी कर्नाटकातील दावणगिरी जिल्ह्यात (Davanagere District, Karnataka) त्यांचा जन्म झाला. बग्गावल्ली सोमशेखर राजू यांची 15 डिसेंबर 1984 रोजी जाट रेजिमेंटमध्ये नियुक्त करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी भारतीय सैन्यात आपल्या कामगिरीनं आपली सेवा गाजवलीय.

38 वर्षांच्या आपल्या शानदार कारकिर्दीत बीएस राजू यांनी लष्कराच्या मुख्यालयात अनेक महत्त्वाच्या रेजिमेंट, कर्मचारी आणि निर्देशात्मक नियुक्त्यांवरही त्यांनी काम केलंय. राजू यांना सेवेतील उत्कृष्ट योगदानाबद्दल उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक आणि युद्ध सेवा मेडलनं गौरवण्यात आलंय.

टॅग्स :Karnatakaindian army