भाजप सरकारवर नामुष्की! PSI भरतीची परीक्षा रद्द करण्याची गृहमंत्र्यांची घोषणा

PSI Recruitment Exam Scam
PSI Recruitment Exam Scamesakal
Summary

सध्या कर्नाटकात पीएसआय भरती परीक्षेचं प्रकरण चांगलंच गाजत आहे.

बंगळुरु (कर्नाटक) : सध्या कर्नाटकात (Karnataka) PSI भरती परीक्षेचं प्रकरण चांगलंच गाजत आहे, त्यामुळं विरोध सरकारला धारेवर धरत आहेत. त्यातच आता कर्नाटकातील पोलीस उपनिरीक्षक (PSI) भरती परीक्षा गैरव्यवहारप्रकरणी (PSI Recruitment Exam Scam) भाजप नेत्या दिव्या हागरगी (Divya Hagargi) यांना पुण्यातून अटक झालीय. या प्रकरणी कर्नाटकातील भाजप सरकार अडचणीत आलंय. अखेर मोठ्या नामुष्कीला सामोरं जावं लागल्यानंतर सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. गृहमंत्र्यांनी पीएसआय भरती परीक्षाच रद्द करण्याची घोषणा केलीय.

कर्नाटकातील पोलीस उपनिरीक्षक भरती परीक्षा गैरव्यवहारामुळं सध्या वातावरण तापलंय. यावरून मोठा गदारोळ सुरू झाल्यानंतर सरकारनं ही परीक्षाच रद्द केलीय. याबाबतची घोषणा गृहमंत्री अरगा जनेंद्र (Home Minister Arga Janendra) यांनी केलीय. ते म्हणाले, कर्नाटक सरकारनं (Government of Karnataka) पीएसआय भरती परीक्षा रद्द केली आहे. आता नव्यानं ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील. या परीक्षेतील गैरप्रकार सीआयडी तपासात समोर आला आहे. या प्रकरणी अडचणीत आल्यानंतर भाजप नेत्या दिव्या या फरार झाल्या होत्या. अखेर त्यांना कर्नाटक पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागानं पुण्यातून ताब्यात घेतलंय.

PSI Recruitment Exam Scam
बारामतीच्या जेवढे नादाला लागले, तेवढे संपलेत : आमदार शिंदे

या प्रकरणी अटक झालेल्या दिव्या या अठराव्या आरोपी आहेत. याआधी त्यांचे पती राजेश यांना अटक करण्यात आला होती. पण, दिव्या फरार झाल्या होत्या. या परीक्षेतील उमेदवारांकडून लाच म्हणून प्रत्येकी 60 लाख रुपये घेण्याचा करार झाला होता. या उमेदवारांनी पेपर लिहिण्यासाठी मायक्रो ब्ल्यू टूथचा वापर केल्याची बाब ‘सीआयडी’ तपासात समोर आली होती. त्यामुळं हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com