1992 कोटींच्या मालकाचा कुटुंबासह दुर्दैवी अंत, फक्त मुलगा बचावला, कसं?

Punit Agarwal
Punit Agarwal

इंदूर : कोट्यवधींची संपत्ती असलेल्या उद्योगपती पुनीत अग्रवाल यांच्यासह सहा जणांचा लिफ्ट कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर आता या दुर्घटनेबाबत नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. पुनीत अग्रवाल यांचा मुलगा निपुण हा त्या इमारतीवर आगोदर गेला असल्याने त्याचा जीव वाचला. तर, त्याची पत्नी गर्भवती असल्याने ती 31 डिसेंबरच्या रात्री सेलिब्रेशनसाठी गेली नव्हती.

इंदूरजवळील पाताळपाणी येथे लिफ्ट कोसळून प्रसिद्ध उद्योगपती पुनीत अग्रवाल यांच्यासह कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील सर्वांत मोठ्या उद्योगपतींपैकी एक अशी त्यांची ओळख होती. या दुर्घटनेतून त्यांची पत्नी निधी या बचावल्या असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पुनीत अग्रवाल यांच्या पाताळपाणी येथील फार्म हाऊसवर नवीन वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीमध्ये ही दुर्घटना घडली. या अपघातात अग्रवाल यांच्यासह त्यांची मुलगी पलक, जावई पलेकश अग्रवाल, नातू आणि दोन नातेवाइकांचा दुर्दैवी अंत झाला. 

अग्रवाल हे पाथ इंडिया कंपनीचे संचालक होते. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अग्रवाल कुटुंबीय मंगळवारी सकाळी फार्महाउसवर आले होते. संध्याकाळी फार्महाउसच्या आजूबाजूच्या परिसरातील सौंदर्य पाहण्यासाठी हे सर्व जण टॉवरवर गेले होते. मात्र, उतरताना 70 फुटांवरून लिफ्ट खाली कोसळली. या अपघातामध्ये लिफ्टमधील सर्वजण बाहेर फेकले गेले. एकानेही सुरक्षेसंदर्भात काळजी न घेतल्याने यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेची माहिती फार्महाउसवरील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व जखमींना चोईथराम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र, या अपघातामध्ये जखमी झालेल्यांपैकी केवळ निधी यांचे प्राण वाचले आहेत. 

पुनित अग्रवाल यांच्याविषयी
पुनीत अग्रवाल हे मध्य प्रदेशमधील सर्वांत मोठ्या उद्योगपतींपैकी एक असून, पाथ इंडिया कंपनीबरोबरच ते 14 कंपन्यांचे संचालक होते. देशभरातील आठ राज्यांमध्ये टोल वसूल करण्याचे कंत्राट पुनीत यांच्या कंपनीकडे आहे. देशभरामध्ये पीपीपी तत्वावर बनवण्यात येणारे रस्ते बांधण्यात, त्यांचे नियोजन करण्यात पुनित यांनी पाथ इंडिया या कंपनीकडे आहे. या कंपनीने आत्तापर्यंत तीन हजार हायवेंचे बांधकाम केले आहे. पुनित यांची एकूण संपत्ती एक हजार 992 कोटी इतकी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com