Lingayat Shivmurti Arrested| लिंगायत शिवमूर्ती मुरुगा यांच्यविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lingayat Shivmurti Arrested

लिंगायत शिवमूर्ती मुरुगा यांच्यविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील मुरुगा मठाचे मुख्य पुजारी शिवमूर्ती मुरुगा यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवमूर्ती मुरुगा यांना सोमवारी अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.(Lingayat Shivmurti Arrested)

शिवमूर्ती हे चित्रदुर्गातील या प्रसिद्ध मुरुगा मठाचे विशेष पुजारी आहेत. मठात त्यांचा विशेष मान आहे. मात्र, त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर मठ वादात सापडले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवमूर्ति यांना हावेरी जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर मठ संचलित संस्थेत अल्पवयीन विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. संस्थेतील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींनी पोलिसांत तक्रार केल्यावर लैंगिक छळाची बाब समोर आली. यानंतर म्हैसूर पोलिसांनी शिवमूर्ती मुरुगाविरोधात एफआयआर नोंदवला. मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या कलमांतर्गत मुरुगाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मठ संचलित या शाळेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींनी म्हैसूरमधील 'ओदानदी सेवा संस्थान' या स्वयंसेवी संस्थेशी (एनजीओ) संपर्क साधला होता. हा ट्रस्ट तस्करी आणि लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या महिला आणि बालकांच्या बचाव, पुनर्वसन आणि सक्षमीकरणासाठी काम करतो.

अल्पवयीन मुलांनी आपल्यासोबत घडलेला प्रसंग सविस्तर सांगितला, त्यानंतर ही बाब जिल्हा बाल कल्याण समितीच्या निदर्शनास आणून दिली. पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, मुरुगा मठाच्या वसतिगृहात राहणाऱ्या १५ आणि १६ वर्षांच्या मुलींचा साडेतीन वर्षांहून अधिक काळ लैंगिक छळ केला जात होता.

Web Title: Lingayat Saint Shivmurti Arrested Karnataka Police Rape Case Minors

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Karnataka