
श्रीनगर : जम्मू-काश्मीर सरकारने खोऱ्यातील ‘जमाते इस्लामी’ आणि ‘फलाह-ए-आम ट्रस्ट’ या संघटनेशी संबंधित असलेल्या २१५ खासगी शाळा ताब्यात घेण्याचा आदेश दिला आहे. मात्र, शिक्षणमंत्री सकिना इतू यांनी शाळा ताब्यात घेतल्याच्या वृत्ताचे खंडन केले. ‘‘२१५ शैक्षणिक संस्था सरकारने ताब्यात घेतलेल्या नाहीत. विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आवश्यक ती कारवाई केली जाईल,’’ असेही त्यांनी स्पष्ट केले.