

Messi visits Vantara in Gujarat
esakal
वन्यजीव संरक्षण व संगोपनासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘वनतारा’ केंद्रास अर्जेंटिनाचा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने आज भेट दिली. माधूरी हत्तीण देखील वनतारा मध्ये आहे. हत्तींणा सांभाळत असलेल्या विभागातही मेस्सी पोहोचला. माणिकलाल या वाचवलेल्या हत्तीच्या पिल्लाजवळ जाऊन त्याच्याविषयी ‘केअरटेकर’कडे चौकशी केली. मेस्सीने माणिकलालसोबत फुटबॉल खेळण्याचा प्रयत्नही केला. या पिल्लानेही उत्साहाने प्रतिसाद दिला. यावेळी माधूरी हत्तीन देखील तिकडेच असण्याची शक्यता आहे.