दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये महिलांचा टांगा पलटी तर पुरुषांची सुटतेय दारू

दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये महिलांचा टांगा पलटी तर पुरुषांची सुटतेय दारू

मुंबई  : लॉकडाऊन काळात दारूची दुकाने काही महिन्यांसाठी बंद होती. अशात अनेकांचं दारूचं व्यसन आपोआप कमी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र तुम्ही मोठ्या टाइमलाईनवर पाहिलंत तर एक धक्कादायक माहिती समोर येतेय. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण विभागाने दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये नुकतंच एक सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून महिलांमध्ये गेल्या पाच वर्षात दारू पिण्याचं प्रमाण कमालीचं वाढल्याचं पाहायला मिळालंय. महत्त्वाची बाब म्हणजे दारू बंदी असलेल्या गुजरात शहरामध्ये महिलांच्या दारू पिण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचं राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण विभागाने जहीर केलेल्या आकडेवारीत पाहायला मिळतंय. 

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण विभागाने नोंदवलेली निरीक्षणे : 

  • 2019-2020 या वर्षी दारु पिणाऱ्या लोकांचे सर्वेक्षण केले गेले. या सर्वेक्षणात महिला आणि पुरुष दोघांना सामील करून घेण्यात आलं होतं. यंदाच्या सर्वक्षणानंतर पाच वर्षांपूर्वीच्या सर्वेक्षणाशी तुलना केली असता गुजरातमध्ये महिलांच्या दारू पिण्याच्या प्रमाणात दुप्पट वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय.
  • तर दुसरीकडे पुरुषांच्या दारू पिण्याच्या प्रमाणात बऱ्यापैकी घट झाल्याचं पाहायला मिळतंय. 
  • 2019-2020 साली करण्यात आलेल्या सर्वेक्षणात महिलांचं दारू पिण्याचं प्रमाण 0.6 टक्के नोंदवलं गेलं आहे, जे 2015 मध्ये दुपटीपेक्षा कमी होतं. 
  • 2015 मध्ये राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये 0.3 टक्के महिला तर 11.1 टक्के पुरुषांनी मद्यप्राशन करत असल्याचं मान्य केलं  
  • 2020 मध्ये केलेल्या सर्वेक्षणांची तुलना केल्यास दारु पिण्याचे प्रमाण महिलांमध्ये वाढले वाढलंय तर पुरुषांमध्ये हे प्रमाण 2015 पेक्षा घटले

ग्रामीण भागात दारु पिणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढले : 

  • 2015 मध्ये दारू पिणाऱ्या महिलांचं प्रामाण 0.1 टक्के होते जे 2020 मध्ये 0.3 टक्क्यांवर आले 
  • शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील महिला जास्त महिला जास्त दारू पित असल्याचे समोर आले.
  • ग्रामीण भागात 2015 मध्ये 0.4 टक्के महिला दारुचे सेवन करत होत्या. तेच प्रमाण 2020 मध्ये 0.8 टक्क्यांवर पोहोचले 

दारु पिणाऱ्या पुरुषांचे प्रमाण घटले : 

ग्रामीण भागामध्ये 2015 साली दारु पिणाऱ्या पुरुषांचे प्रमाण 11.4% होते ते  आता कमी होऊन 2020 मध्ये 6.8% टक्क्यांवर आले. 

liquor consumption in women specifically in gujrat increased by double compared to survey in 2015

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com