esakal | बिर्याणी पार्टीच्या आड घातपाताचा डाव, इंस्टाग्रामवर मेसेज करून बोलावलं भेटायला
sakal

बोलून बातमी शोधा

बिर्याणी पार्टीच्या आड घातपाताचा डाव, इंस्टाग्रामवर मेसेज करून बोलावलं भेटायला

बिर्याणीची पार्टी करण्याची सबब पुढे करून फोन करून बोलावून नंतर जबरदस्तीने रुग्णवाहिकेत बसवून चॉपरचा धाक दाखवून अपहरण करणाऱ्या पाच आरोपीना आरे पोलिसांनी बेड्या ठोकल्या

बिर्याणी पार्टीच्या आड घातपाताचा डाव, इंस्टाग्रामवर मेसेज करून बोलावलं भेटायला

sakal_logo
By
राजू परुळेकर

मुंबई : बिर्याणीची पार्टी करण्याची सबब पुढे करून फोन करून बोलावून नंतर जबरदस्तीने रुग्णवाहिकेत बसवून चॉपरचा धाक दाखवून अपहरण करणाऱ्या पाच आरोपीना आरे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि अपहरण करून हत्येचा डाव उधळून लावला. 

याबाबतची हकीकत अशी की, पोलिस कंट्रोलवर प्रसारित झालेल्या संदेशाची दखल आरे पोलिसांनी घेऊन आरे कॉलनी, छोटा काश्मीर गार्डन येथून एका इसमाला रुग्णवाहिकेत जबरदस्तीने बसवून अपहरण करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. आरे पोलिसांनी रुग्णवाहिका आणि तांत्रिक तपासद्वारे  पाच आरोपी गजाआड करण्यात पोलिसांना यश आलंय. अपहरण करण्यात येणाऱ्या व्यक्तीची ही सुखरूप सुटका करण्यात आली.

Bird Flue in Mumbai |मृत कावळ्यांना लागण; कच्चे मांस आणि कच्ची अंडी न खाण्याचे आवाहन

कोणाकोणाला घेतलं ताब्यात 

आरे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये मालाड मालवणीमध्ये राहणारे मोहम्मद फारुख शेख वय 20 वर्षे, ओवेस नाबिऊल्लाह शेख, वय 18 वर्षे, मोहम्मद मोनीस सय्यद वय 20 वर्षे,  तर कांदिवलीतील चारकोपमध्ये राहणार तर निहाल झाखीर खान, वय 32 वर्षे आणि आरोपी सत्यम शिवकुमार पांडे या 23 वर्षीय तरुणांचा समावेश आहे. पोलिसांनी या पाचही आरोपींकडून चौकशी केल्यानंतर सत्य समोर आलं आणि आरोपींचा प्लॅन देखील समोर आला. 

खुनाचा प्रयत्न करण्याप्रकरणी जामिनावर सुटलेले आरोपी

अपहृत व्यक्ती आणि अपहरणकर्ते या दोघांमध्ये पूर्ववैमनस्य होते. मालाड मालवणी पोलिस ठाण्यात त्यावर खुनाचे आणि खुनाचा प्रयत्न करणे असे गंभीर गुन्हे  दाखल आहेत. अपहृत इसम हा मालवणी पोलिसांना खुनाच्या गुन्ह्यात वॉन्टेड आरोपी आहे. तर अपहरण करणारे आरोपी हे खुनाचा प्रयत्न करण्याप्रकरणी जामिनावर सुटलेले आरोपी आहेत.

Health Alert | मुंबईत तापमानासह प्रदूषणाची पातळी वाढल्याने 'हेल्थ अलर्ट' जारी

अपहरण करण्याचा अयशस्वी प्रयत्न

अपहृत व्यक्तीने जून 2020 रोजी मालवणी येथे राहणार अल्ताफ नावाच्या इसमाचा खून केला होता. दरम्यान खून झालेल्या व्यक्तीच्या बहिणीने अपहृत इसम याला इंस्टाग्रामवर मेसेज टाकून समक्ष भेटण्यासाठी छोटा काश्मीर येथे बोलावले. त्यानंतर अपहृत इसम येताच त्याला रुग्णवाहिकेमध्ये जबरदस्तीने टाकून अपहरण करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

पाच आरोपी गजाआड

आरे पोलिसांनी मात्र संदेशाची गंभीरता पाहून तांत्रिक तपासद्वारे पाच आरोपीना गजाआड करून आरोपींचा अपहरणाचा आणि नंतर हत्या करण्याचा डाव उधळून लावला. या प्रकारची आरे पोलिस ठाण्यात पाचही आरोपीच्या विरोधात भादंवि 364,397,120(ब) आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला असून त्यांचे अपहरण करून हत्या करण्याचा मनसुबा होता हे तपासात स्पष्ट झाले.

मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

cops captured criminals who were planning to carry off man by calling him for biryani party

loading image