liquor Policy : ‘ईडी’च्या चौकशीला केजरीवालांची दांडी; केंद्रावर टीका; प्रचारासाठी रवाना

ईडी’च्या नोटिशीला पत्राद्वारे उत्तर देतानाच केजरीवाल हे मध्यप्रदेशात विधानसभा
kejriwal
kejriwalsakal
Updated on

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीला दांडी मारली. ‘ईडी’ने पाठविलेले समन्स हे राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे सांगत केजरीवाल यांनी गुरुवारी ‘ईडी’ च्या कार्यालयात चौकशीसाठी जाणे टाळले.

मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’ने केजरीवाल यांना सकाळी अकरा वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. भाजपच्या सांगण्यावरून ‘ईडी’ने समन्स बजावल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे. हे समन्स बेकायदा आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे त्यामुळे ते मागे घेतले जावे, असे केजरीवाल यांनी नमूद केले.

‘ईडी’च्या नोटिशीला पत्राद्वारे उत्तर देतानाच केजरीवाल हे मध्यप्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी निघून गेले. ‘‘मी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जाऊ नये यासाठी भाजपने कट रचला आहे. त्यामुळेच ‘ईडी’च्या माध्यमातून नोटीस देण्यात आली आहे,’’ असा आरोप केजरीवाल यांनी केला.

kejriwal
Arvind Kejriwal : ...म्हणून अरविंद केजरीवालांनी ईडी चौकशी टाळली; मध्य प्रदेशात प्रचारासाठी रवाना

दरम्यान मद्य धोरण गैरव्यवहारात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तसेच खासदार संजय सिंह हे ‘आप’चे दोन नेते आधीपासूनच तुरुंगात आहेत. दुसरीकडे केजरीवाल यांची या प्रकरणात गेल्या एप्रिल महिन्यात ‘सीबीआय’ने चौकशी केली होती. त्यावेळी केजरीवाल यांना ५६ प्रश्न विचारण्यात आले होते. आता ‘ईडी’कडून केजरीवाल यांना नव्याने नोटीस जारी केली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

kejriwal
Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढणार? आपच्या गोटात हालचालींना वेग, ED चौकशीकडे लक्ष

राजकुमार आनंद यांच्यावर कारवाई

‘आप’चे नेते आणि केजरीवाल सरकारमधील मंत्री राजकुमार आनंद यांच्या कार्यालयांवर देखील ‘ईडी’ने छापे घातले. ‘सिव्हिल लाइन्स’मधील सरकारी निवासस्थानासह नऊ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. ‘ईडी’च्या या ताज्या कारवाईवर ‘आप’कडून टीका करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.