हेलिकॉप्टर दुर्घटना : बिपीन रावत यांच्यासोबत कोण प्रवास करत होते?

या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे.
CDS Bipin Rawat Helicopter Crash
CDS Bipin Rawat Helicopter CrashEsakal

बंगळुरू : भारताचे सीडीएस बिपिन रावत (CDS Bipin Rawat) यांचे तामिळनाडुतील कुन्नुर येथे झालेल्या हेलिकॉप्टर क्रॅश (Helicopter Crash ) अपघातात रावत यांच्यासह 14 जणांचा निधन झाले आहे. तामिळनाडुत ही दुर्घटना घडली. अपघातावेळी 14 जण या हेलिकॉप्टरमध्ये होते. तामिळनाडूतल्या कुन्नूर परिसरात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. सीडीएस बिपिन रावत यांच्यासह पत्नी, संरक्षण सहाय्यक, सुरक्षा कमांडो आणि आयएएफ पायलट यांच्यासह एकूण 14 लोक हेलिकॉप्टरमध्ये होते. (List of passengers and crew onboard the crashed helicopter)

Passenger List
CDS Bipin Rawat Helicopter Crash
कोण आहेत बिपीन रावत

हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करत असलेल्यांची नावे

सीडीएस जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत (Madhulika Rawat), ब्रिगेडियर एल. एस. लिडेर, लेफ्टिनेंट कर्नल हरजिंदर सिंह, एन.के. गुरसेवक सिंह, एन.के. जितेंद्र कुमार, L/NK विवेक कुमार, L/NK बी. तेजा, हवालदार सतपाल आदी या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते.

अपघाताच्या चौकशीचे आदेश

सीडीएस बिपन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्यानंतर हवाई दलाने चौकशीचे आदेश (Helicopter Crash inquiry ) दिले आहेत. या हेलिकॉप्टरमधून रावत यांच्या पत्नीसह लष्कराचे वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते.

कुठे निघाले होते रावत

सीडीएस बिपीन रावत बुधवारी वेलिंग्टन आर्मी सेंटर कुन्नूर येथे कॅडेट संवाद कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी गेले होते. त्यानंतर त्यांचे हेलिकॉप्टरला दुपारी 12.20 च्या सुमारास अप्पर कुन्नूरजवळ अपघात झाला. अपघातावेळी हेलिकॉप्टर हेलिपॅडपासून 10 किलोमीटर अंतरावर होते, यावेळी हेलिकॉप्टरमध्ये रावत यांच्यासह 14 प्रवासी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com