
लिव इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेचा मृतदेह सहा महिन्यांनी फ्रीजमध्ये आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी महिलेच्या विवाहित प्रियकराला अटक करण्यात आलीय. धक्कादायक बाब म्हणजे ज्या खोलीत मृतदेह ठेवला होता त्याच्या बाजूलाच भाडेकरू कुटुंबीय राहतं. तरीही कुणालाच याची कुणकुणही लागली नाही. फ्रीज बंद पडल्यानंतर दुर्गंधी पसरल्यानं सगळा प्रकार उघडकीस आला. मध्य प्रदेशातील देवास इथं ही घटना घडलीय.