जळगावमधील मुक्ताईनगर येथील स्थानिक पोलीस आणि एलसीबीने संयुक्त कारवाईत ३४१ किलो गांजा जप्त केला.
मुक्ताईनगर -तालुक्यातील मानेगाव शिवारात केळीच्या बागेत अवैधपणे गांजाची लागवड सुरू होती.
जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि मुक्ताईनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करून पूर्णपणे उद्ध्वस्त केली.
याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली.