Live Updates:सुशांतसिंह राजपूत प्रकरण, सुप्रीम कोर्टात काय चाललंय?

टीम ई-सकाळ
Thursday, 13 August 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आज, सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. 

नवी दिल्ली : सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आज, सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिने प्रकरणाची सुनावणी मुंबईतच व्हावी, अशी याचिका सुरुवातीला दाखल केली होती. त्यानंतर तिने इलेक्ट्रॉनिक मीडियाकडून तिच्या विरोधात मीडिया ट्रायल केली जात असल्याचा आरोप करत कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. या संपूर्ण प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी करायचा की बिहार पोलिसांनी की, सीबीआयने या वरून राजकीय वाद रंगलाय. 

सुशांत आणि बॉलिवूडच्या इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा

काय घडलंय सुप्रीम कोर्टात?

  • प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत नको; रिया चक्रवर्तीच्या वकिलांची कोर्टात मागणी
  • सुरुवातीला मुंबई पोलिस तपास, चौकशी करू देत; त्यात दुर्लक्ष झाल्यास सीबीआय चौकशीचा विचार करावा : रिया चक्रवर्तीच्या वकिलांचे म्हणणे 
  • बिहार पोलिसा त्यांच्या अधिकारक्षेत्राच्या बाहेर काम करत आहेत : रिया चक्रवर्तीच्या वकिलांचे म्हणणे 
  • मुंबई पोलिसांनी बिहारच्या तपास पथकाला सहकार्य केले नाही, सुशांतच्या तपासाची कागदपत्रे बिहारच्या पथकाला देण्यात आली नाही : बिहार सरकारचा कोर्टात आरोप
  • मुंबई पोलिसांनी सुशांत पोस्टमॉर्टम रिपोर्टही शेअर करेला नाही : बिहार सरकारचा कोर्टात आरोप
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: live updates Sushant Singh Rajput death case supreme court hearing