esakal | LJP खासदार प्रिन्स यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

LJP खासदार प्रिन्स यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा

न्यायालयाने खासदार प्रिन्स राज आणि त्यांचे चुलत भाऊ चिराग पासवान यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.

LJP खासदार प्रिन्स यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बिहारच्या समस्तीपुर मतदारसंघातील लोजपा खासदार प्रिन्स राज यांच्या विरोधात कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी तीन महिने आधी एका महिलेनं केलेल्या तक्रारीच्या आधारे बलात्काराचा गुन्हा दाखल केला. एफआयआरमध्ये लोजपा नेते चिराग पासवान यांचेही नाव आहे. चिराग यांचे चुलत भाऊ असलेले प्रिन्स यांच्याविरोधात कारवाई होण्यात चिराग पासवान यांनी अडथळा आणल्याचा आरोप केला आहे.

दिल्लीच्या न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर पोलिसांनी नऊ सप्टेंबरला एफआयआर दाखल केली होती. या प्रकरणी चिराग पासवान किंवा प्रिन्स राज यांनी कोणतीही प्रितिक्रिया दिलेली नाही. महिलेचे वकील सुदेश कुमारी जेठवा यांनी सांगितलंत की, आम्ही मे महिन्यात दिल्ली पोलिसात तक्रार दाखल केली होती. तसंच जुलै महिन्यात दिल्लीतील एका न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने खासदार प्रिन्स राज आणि त्यांचे चुलत भाऊ चिराग पासवान यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.

प्रिन्स राज हे लोजपाच्या त्या पाच खासदारांपैकी एक आहेत ज्यांनी जून महिन्यात चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील पक्षात बंडखोरी केली होती. प्रिन्स यांनी १० फेब्रुवारीला तक्रारदारांविरोधात खंडणीची तक्रार दाखल केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, माझ्यावर एका महिलेने काही आरोप केल्याचं मला समजलं आहे. आम्ही १० फेब्रुवारीलाच तक्रार दाखल केली होती आणि त्यांसदर्भात पोलिसांकडे पुरावेसुद्धा दिले होते.

हेही वाचा: ७१ टक्के लहान मुलांच्या शरीरात अँटिबॉडीजची निर्मिती - PGIMER संचालक

महिलेनं प्रिन्स राज यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यात म्हटलं की, प्रिन्स राज यांना पक्षाच्या कार्यालयात पहिल्यांदा भेटले आणि त्यानंतर संपर्कात होतो. एका मिटिंगवेळी टेबलवर ठेवलेली पाण्याची बाटली घेत असताना त्यांनी थांबवलं आणि त्याऐवजी एका ग्लासमधून पाणी प्यायला दिलं. तेव्हा मी बेशुद्ध झाले होते. शुद्धीवर आल्यानंतर माझं डोकं प्रिन्स राज यांच्या खांद्यावर होतं. त्यांनी मला सांगितलं की, तुला बरं वाटत नव्हतं. मी विचारलंसुद्धा की मला काय झालं? माझ्यासोबत काय घडलं? त्यावेळी त्यांनी मला एक व्हिडिओ रेकॉर्ड केलेला दाखवला असा आरोप महिलेनं केला आहे.

महिलेनं आरोप करताना म्हटलं की, त्यांनी माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यात त्यांनी स्वत:चा चेहरा दिसणार नाही याची खबरदारी त्यांनी घेतली होती. तसंच मला लग्नासाठी विचारलं आणि नाही म्हणल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचंही महिलेनं म्हटलं आहे.

हेही वाचा: PM मोदी उत्तर प्रदेश दौऱ्यावर, अलीगढ विद्यापीठाची कोनशीला बसवणार

खासदार प्रिन्स राज यांनी १७ जून रोजी एक ट्विट केलं होतं. त्यात म्हटलं होतं की, मी महिलेनं केलेला दावा फेटाळून लावतो. हे सर्व दावे खोटे आहेत. माझी प्रतिमा मलिन करण्याचा आणि माझ्यावर दबाव आणण्यासाठी हा कट असल्याचा आरोपही प्रिन्स राज यांनी केला होता. प्रिन्स राज हे रामविलास पासवान यांचे लहान भाई रामचंद्र पासवान यांचे पुत्र आहेत.

loading image
go to top