esakal | "तिसऱ्या लाटेचा लहानग्यांना धोका कमी, 71 टक्के मुलांमध्ये अँटिबॉडीज"
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination to Children

"तिसऱ्या लाटेचा लहानग्यांना धोका कमी, 71 टक्के मुलांमध्ये अँटिबॉडीज"

sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: चंदीगच्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चने (PGIMER) सिरो सर्वेक्षण (sero survey) केले आहे. या सिरो सर्वेक्षणात लहान मुलांच्या ७१ टक्के नमुन्यांमध्ये अँटिबॉडीज आढळून आल्या आहेत. पीजीआयएमईआरचे संचालक डॉ. जगत राम (dr. jagat ram) यांनी सोमवारी ही माहिती दिली. २७०० लहान मुलांचे (childrens) सिरो सर्वेक्षण करण्यात आले आहे.

"कोविड-१९ च्या तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आपण आहोत. चंदीगड PGIMER ने हे सिरो सर्वेक्षण केले आहे. २७०० पैकी ७१ टक्के लहान मुलांमध्ये अँटिबॉडीज तयार झाल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर प्रमाणाबाहेर परिणाम होणार नाही" असे डॉ. जगत राम यांनी या सर्वेक्षणाबद्दल म्हटले आहे. चंदीगडच्या ग्रामीण, शहरी आणि झोपडपट्टी असलेल्या भागातून हे नमुने गोळा करण्यात आले आहेत.

हेही वाचा: मुंबई मॉडेल काय चाटायचे आम्ही ? नितेश राणेंचे शिवसेनेला प्रत्युत्तर

"६९ ते ७३ टक्के लहान मुलांमध्ये अँटिबॉडीज तयार झाल्या आहेत. सरासरी ७१ टक्के लहान मुलांच्या नमुन्यांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या. लहान मुलांसाठी अजूनतरी लस उपलब्ध नाहीय. त्यामुळे कोविड-१९ च्या संसर्गातूनच या अँटिबॉडीज तयार झाल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर परिणाम होईल, असे वाटत नाही" असे PGIMER चे संचालक डॉ. जगत राम यांनी सांगितले.

हेही वाचा: बायडेन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मोदींचा पहिलाच अमेरिका दौरा

महाराष्ट्र आणि दिल्लीमध्येही करण्यात आलेल्या सिरो सर्वेक्षणात ५० ते ७५ टक्के लहान मुलांमध्ये अँटिबॉडीज तयार झाल्याचे डॉ. जगत राम यांनी सांगितले. वेगवेगळे सर्वे तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना मोठा फटका बसणार नसल्याचे संकेत देत आहेत, याकडे डॉ. जगत राम यांनी लक्ष वेधले. लोकांनी कोविड नियमांचे पालन केले आणि लसीकरण करुन घेतले, तर तिसरी लाट प्रभावी ठरणार नाही, असे त्यांचे मत आहे.

loading image
go to top