

Lal Krishna Advani Hospitalized
Esakal
माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना शुक्रवारी रात्री दिल्लीतील अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. वयोमानानुसार त्यांना आरोग्याचा त्रास होत आहे. शुक्रवारी छातीत संसर्ग झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. सध्या त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहेत. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.