esakal | दिल्लीसह आणखी चार राज्यात निर्बंध लागू
sakal

बोलून बातमी शोधा

Lockdown

दिल्लीसह आणखी चार राज्यात निर्बंध लागू

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - राष्ट्रीय राजधानीत कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस अधिकाधिक भीषण होत असल्याने सोमवारनंतर आणखी आठवडाभर म्हणजे ११ मेपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज ट्विटरवरून केली. महाराष्ट्र, कर्नाटकपाठोपाठ हरियाना, ओदीशासह मिझोराममध्येही निर्बंध लागू करण्यात आले.

दिल्लीतील परिस्थिती आटोक्‍यातच येत नसल्याने तुम्ही लष्कराचीच मदत घ्या अशी सूचना न्यायालयाने दिल्ली सरकारला केली आहे. दरम्यान, दिल्लीतील बात्रा रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आज बारा रुग्णांनी प्राण सोडले. ही संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा: नायट्रोजन प्रकल्पांना ऑक्सिजन प्रकल्पांत रुपांतरीत करणार - PMO

हरियाना आजपासून लॉक

चंडीगड - हरियानाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनी तीन मेपासून एक आठवडा संपूर्ण राज्यात लॉकडाउन जाहीर केले. गुरगावसह नऊ जिल्ह्यांत शुक्रवारी रात्री दहा ते सोमवारी पहाटे पाच लॉकडाउन लावण्यात आले होते. राज्यातील ५१ टक्के संसर्ग दिल्ली लगतच्या गुरगावसह फरिदाबाद, सोनीपत आणि झज्जर या जिल्हांतील आहे.

ओडिशात दोन आठवडे निर्बंध

भुवनेश्‍वर - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ओडिशात रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने राज्यात १४ दिवसांचा लॉकडाउन सरकारने रविवारी जाहीर झाला आहे. याची अंमलबजावणी बुधवारपासून (ता.५) होणार आहे.

मिझोराममध्ये निर्बंध

एजॉल - राजधानी एजॉलसह मिझोराममधील ११ जिल्ह्यांतील मुख्यालयांच्या शहरात तीन मेपासून आठ दिवसांसाठी लॉकडाउन लावण्यात येईल.

ऑक्सीजनसाठी पत्र लिहूनही...

केंद्र सरकारला आम्ही ऑक्सिजन पुरवठा बाबत वारंवार पत्र लिहीत आहोत आणि संपर्कही साधता आहोत. मात्र आम्हाला प्रतिसाद मिळत नाही अशी तक्रार मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पुन्हा एकदा केली.

loading image