esakal | नायट्रोजन प्रकल्पांना ऑक्सिजन प्रकल्पांत रुपांतरीत करणार - PMO
sakal

बोलून बातमी शोधा

Oxygen

नायट्रोजन प्रकल्पांना ऑक्सिजन प्रकल्पांत रुपांतरीत करणार - PMO

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : कोविडच्या उद्रेकामुळं देशात निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या मोठ्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर सरकार एक नवी योजना राबवण्याच्या विचारात आहे. या योजनेनुसार, सध्या देशात सुरु असलेल्या नायट्रोजन निर्मिती प्रकल्पांना ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांमध्ये रुपांतरीत करण्यावर सरकार काम करत आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयानं दिली आहे.

हेही वाचा: निवडणूक आयोगाच्या मदतीशिवाय भाजपनं ५० चा आकडाही गाठला नसता - ममता बॅनर्जी

नायट्रोजन निर्मिती प्रकल्पांशी याबाबत चर्चा झाल्याचं पीएमओनं सांगितंल आहे. नायट्रोजन प्रकल्पांमध्ये कार्बन मोलेक्युलर सीव्ह (सीएमएस) वापरलं जातं तर झिओलाइट मोलेक्युलर सीव्ह (झेडएमएस) हे ऑक्सिजनच्या निर्मितीसाठी गरजेचं असतं. त्यामुळे सीएमएस हे झेडएमएसमध्ये बदलून आणि ऑक्सिजन अॅनालायझर, कन्ट्रोल पॅनल सिस्टिम, फ्लो व्हॉल्व्ह यांसारखे काही बदल करुन ऑक्सिजनची निर्मिती करण्यावर विचार सुरु आहे, असं पीएमओनं म्हटलं आहे.

हेही वाचा: ममता बॅनर्जी, स्टॅलिन आणि पिनरायी विजयन यांचं पंतप्रधान मोदींनी केलं अभिनंदन

या फॉर्म्युल्याबाबत उद्योगांशी चर्चा केल्यानंतर १४ उद्योग असे आढळून आले ज्यांमध्ये अशा प्रकारे प्रकल्पांचं रुपांतरण सुरु आहे. तर ३७ नायट्रोजन प्रकल्प आढळून आले आहेत, ज्यांच्याशी याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

हेही वाचा: "विजयाबद्दल जनतेचे आभार, आता कोरोनाविरोधातील लढ्याला प्राधान्य" - ममता बॅनर्जी

अशा प्रकारचे नायट्रोजनचे प्रकल्प ऑक्सिजन निर्मितासाठी एकतर थेट रुग्णालयांमध्ये शिफ्ट करता येतील किंवा जर ते शक्य नसेल तर त्या प्रकल्पातच ऑक्सिजन निर्मिती केली जाईल आणि त्यानंतर तयार झालेला ऑक्सिजन खास टँकरमधून रुग्णालयांपर्यंत पोहोचवला जाऊ शकतो.

आयआयटी बॉम्बेनं तयार केलं युनिट

नुकतचं आयआयटी बॉम्बेनं एक डेमो युनिट तयार केलं होतं. यामध्ये जे नायट्रोजन जनरेटर्स देशभरात सहज मिळतात त्यांचं रुपांतर ऑक्सिजन जनरेटर्समध्ये करण्यात आलं होतं. याचाच वापर करुन केंद्र सरकारने ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्याच्या दृष्टीने ही योजना आखली आहे.

loading image
go to top