उत्तर प्रदेशात १० मेपर्यंत लॉकडाउन; लसीकरण सुरूच राहणार

लॉकडाउन
लॉकडाउनईसकाळ

लखनौ : कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहून उत्तर प्रदेश (Uttar Pradesh )सरकारने राज्यात दहा मे पर्यंत लॉकडाउन (Lockdown ) वाढवण्याचा निर्णय घेतला. हा लॉकडाउन १० मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत लागू असेल. योगी आदित्यनाथ सरकारकडून दर दोन दिवसाला लॉकडाउनचा कालावधी वाढवला जात आहे. लॉकडाउनच्या घोषणेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी सरकारकडून दीर्घकाळासाठी घोषणा केली जात नसल्याचे सूत्राने म्हटले आहे. यादरम्यान उत्तर प्रदेशातील सर्वच जिल्ह्यात ‘मिनी कर्फ्यू’ सारखी स्थिती असेल. (Lockdown in Uttar Pradesh extended till May 10 morning, sanitisation drive to be intensified)

तत्पूर्वी उत्तर प्रदेश सरकारने (Yogi Adityanath) सहा मे रोजी सकाळी सात वाजल्यापासून अंशत: कोरोना संचारबंदी लागू केली होती. वास्तविक विकएंड लॉकडाउन गेल्या शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून ते मंगळवारी सकाळी सात वाजेपर्यंत लागू होते. परंतु त्यास सहा मेपर्यंत वाढवण्यात आला. आता त्याला दहा मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ‘मिनी कर्फ्यू’च्या काळात अत्यावश्‍यक सेवा सुरू राहणार आहेत. यादरम्यान लसीकरण मोहीम सुरूच राहणार आहे. बाजार, दुकान, शॉपिंग मॉल्स, सिनेमा हॉल, रेस्टॉरंट बंद राहतील. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले. औषधाची दुकाने आणि रुग्णालय नेहमीप्रमाणेच सुरू रातहील. राज्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी योगी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. राज्यात तब्बल दहा जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार अधिक आहे.

लॉकडाउन
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

हरियानात पास नसताना फिरल्यास गुन्हा

लॉकडाउनच्या काळात अकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांविरोधात हरियाना सरकार कडक कारवाई करत आहे. राज्यातील वाढत्या रुग्णांमुळे सरकार चिंतेत आहे. गरज असल्यास नागरिकांना पास मिळतो, असे पोलिसांनी सांगितले आहे. स्थानिक पातळीवर उपायुक्तांकडून पास दिले जातील आणि त्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. पासविना घराबाहेर आढळून आल्यास गुन्हा दाखल केला जाणार आहे. राज्यातील कोविड देखरेख समितीने बैठकीत अत्यावश्‍यक सेवेचे दुकाने टप्प्याटप्प्यात सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहते. सर्वच दुकाने दररोज सुरू राहणार नाहीत तर सम-विषम तत्त्वाने सुरू राहतील. हॉटेल, व्यायामशाळा, क्लब, रेस्टॉरंट हे संपूर्णपणे बंद राहतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com