esakal | ...अन् 'त्या' व्हिडिओमुळे सापडले वडील!
sakal

बोलून बातमी शोधा

lockdown in panjab young man meet his father after 2 years becouse video viral

देशात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनमुळे अनेक निराधारांची उपासमार होऊ लागली. पण, या निराधारांना पोलिसांनी अन्न दिले आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमुळे दोन वर्षापासून हरवलेले वडील सापडले आहेत.

...अन् 'त्या' व्हिडिओमुळे सापडले वडील!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लुधियाना (पंजाब): देशात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनमुळे अनेक निराधारांची उपासमार होऊ लागली. पण, या निराधारांना पोलिसांनी अन्न दिले आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमुळे दोन वर्षापासून हरवलेले वडील सापडले आहेत.

Video: वानराने मारली वाघाच्या थाडकान थोबाडीत...

पोलिस कर्मचारी अजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनदरम्यान गरजुंना मदत करतानाचा एक व्हिडिओ तयार करण्यात आला होता. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाला. पंजाबमध्ये तयार केलेला व्हिडिओ तेलंगणामध्ये पाहिला गेला आणि एका मुलाने आपल्या वडिलांना ओळखले. दोन वर्षापूर्वी ताटातूट झालेल्या बाप-लेकाची या व्हिडिओमुळे पुन्हा भेट झाली.

तेलंगणा इथल्या कोठागुडमधील रोद्दम पेद्दीराजू याला व्हिडिओमुळे वडील मिळाले आहेत. त्याने सांगितले की, 'एप्रिल 2018 मध्ये वडील कामाच्या शोधात शेजारच्या गावात जातो असे सांगून घराबाहेर पडले होते. पण, ते परत आलेच नाहीत. त्यांना खूप शोधण्याचा प्रयत्न केला. पण, सापडले नाहीत. एका व्हिडिओमुळे मला वडील भेटले, त्यामुळे खूप आनंद झाला आहे.'

विकृतीचा कळस! म्हणून तो चोरायचा चप्पला...

रोद्दामच्या वडिलांनी सांगितले की, 'दोन वर्षापूर्वी कामासाठी घराबाहेर पडलो आणि एका ट्रकमध्ये बसलो. ट्रकमध्ये झोप लागल्यामुळे उतरायचे लक्षात आले नाही. ट्रक चालताने जेव्हा उठवले आणि उतरवले त्यावेळी चुकल्याचे लक्षात आले. पण, येथील भाषा समजत नव्हती. शिक्षण नसल्यामुळे कोणाशी संवादही साधता येत नव्हता. त्यामुळे येथील एका पुलाखाली राहात होतो. पोलिसांनी बनवलेल्या व्हिडिओमुळे मला माझे घर मिळाले आहे.'

प्रेमीयुगलांनो प्रेमाचे पुरावे दाखवा अन् एकमेकांना भेटा...

loading image