esakal | Video: वानराने मारली वाघाच्या थाडकान कानशीलात...
sakal

बोलून बातमी शोधा

monkey slept tiger old video goes viral susanta nanda ifs twitted video

वन्य प्राणी वाघाच्या नादाला लागताना दिसत नाहीत. पण, एका वानराला हुकी आली आणि त्याने थाडकान वाघाच्या थोबाडीत मारली. यामुळे वाघ चिडला आणि पाठलाग करू लागला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video: वानराने मारली वाघाच्या थाडकान कानशीलात...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्लीः वन्य प्राणी वाघाच्या नादाला लागताना दिसत नाहीत. पण, एका वानराला हुकी आली आणि त्याने थाडकान वाघाच्या थोबाडीत मारली. यामुळे वाघ चिडला आणि पाठलाग करू लागला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रेमीयुगलांनो प्रेमाचे पुरावे दाखवा अन् एकमेकांना भेटा...

आयएफएस अधिकारी सुशांत नंदा हे नेहमी प्राण्यांचे व्हिडिओ ट्विटरवरून अपलोड करतात. त्यांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओंनाही नेटिझन्सची मोठी पसंती मिळताना दिसते. त्यांनी एक वानराचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ जुना असल्याचे सांगितले. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पाहा, असेही त्यांनी शीर्षकामध्ये म्हटले आहे. वानराने वाघाची कशी जिरवली आणि त्यांच्यातल्या हल्ल्याचा खेळ कसा रंगला हे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Video: धाडसी आजीने वाजवली नागाची पुंगी...

व्हायरल केलेल्या व्हिडिओमध्ये वानर झाडावर खेळताना दिसत आहे. झाडाखाली दोन वाघ शांत बसले होते. वानर वाघांना पाहते आणि त्यांची खोड काढायला सुरवात करते. झाडावरून टणाटणा उड्या मारीत जाणाऱ्या वानरानं वाघाची खोड काढली. वाघाच्या थाडकान थोबाडीत मारली. चिडलेला वाघही या वानराचा पाठलाग करू लागला. पण, वानर एका झाडावरून दुसऱया झाडावर उड्या मारत आहे.

loading image
go to top