
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर पण लॉकडाऊनमुळे प्रेमीयुगलांना भेटता येत नाही. एक प्रियकराने मुलीच्या वेषात प्रेयसीला भेटायला चालला होता. पण, पोलिसांनी त्याला पकडलाच.
सुरत (गुजरात): कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर पण लॉकडाऊनमुळे प्रेमीयुगलांना भेटता येत नाही. एक प्रियकराने मुलीच्या वेषात प्रेयसीला भेटायला चालला होता. पण, पोलिसांनी त्याला पकडलाच.
लॉकडाऊनदरम्यान व्हिडिओ किंवा चॅटशिवाय प्रेमीयुगलांपुढे दुसरा पर्याय राहिलेला नाही. यामुळे एकमेकांच्या भेटीसाठी अनेकजण आतुर झाले आहेत. येथील एका युवकाने (वय 19) आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी चक्क मुलीचा वेष परिधान केला आणि मध्यरात्री रस्त्याने निघाला. पण, पोलिसांच्या नजरेतून तो चुकला नाही. पोलिसांनी विचारल्यानंतर तो काही बोलू शकला नाही. त्यांनतर पोलिसांनी चेहऱयावरची ओढणी काढली तेव्हा या मुलाची पोलखोल झाली. ओढणी काढल्यानंतर हा मुलगा असल्याचे पाहून पोलिस कर्मचारीही चक्रावले. पोलिसांनी सांगितले की, युवकाने ओढणीने तोंड झाकले होते. पोलिसांना टाळण्यासाठी त्यानं असा गेटअप केल्याचे सांगितलं. या युवकाविरुद्ध महामारी कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
क्वारंटाईन सेंटरमध्ये घुसला साप अन्...
मुलाने सांगितले की, 'पोलिस महिलांची आणि मुलींची चौकशी करत नाही. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी हा मार्ग निवडला होता. पण, माझा प्रयत्न अयशस्वी झाला.'