क्वारंटाईन सेंटरमध्ये घुसला साप अन्...

वृत्तसंस्था
Tuesday, 26 May 2020

क्वारंटाईन सेंटरमध्ये एका कुटुंबाला ठेवण्यात आले होते. पण, सापाने या खोलीत प्रवेश केल्यानंतर चिमुकलीला दंश केला. काही वेळातच चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना येथे घडली.

नैनीताल (उत्तराखंड): क्वारंटाईन सेंटरमध्ये एका कुटुंबाला ठेवण्यात आले होते. पण, सापाने या खोलीत प्रवेश केल्यानंतर चिमुकलीला दंश केला. काही वेळातच चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना येथे घडली.

म्हशीनी चांगलीच जिरवली; व्हिडिओ व्हायरल...

एक कुटुंब उपचारासाठी दिल्लीला गेले होते. पण, लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर हे कुटुंब बेतालघाट जिल्ह्यातील गावी परतले होते. पण, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे गावकऱयांनी त्यांना गावातील शाळेत क्वारंटाईन केले होते. आई-वडील, एक मुलगा आणि एक मुलगी असे चौघेजण शाळेत राहात होते. आई-वडील शाळेच्या वरांड्यात बसले होते. यावेळी मुलगी खोलीमध्ये झोपली होती. सापाने खोलीत प्रवेश करून मुलीच्या डाव्या कानाला दंश केला. काही वेळातच आई खोलीत आल्यानंतर साप तिच्या शेजारी बसल्याचे पाहिले. सापाला धरून दूर फेकले आणि मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पण, उपचारापूर्वीच अंजलीचा (वय 6) मृत्यू झाला होता.

नवरी म्हणाली; काही झालं तरी लग्न करणारचं अन्...

दरम्यान, अंजलीला सापाने दंश केल्याचे समजल्यानंतर कुटुंबियांनी 108 या क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिकीची मागणी केली होती. पण, रुग्णवाहिकीचे चाक पंक्चर झाल्यामुळे वेळेत येऊशकली नाही. रुग्णवाहिका वेळेत आली असती तर अंजलीचा जीव बचावला असता. सरकारने क्वारंटाईन सेंटरमध्ये काळजी घेतली नसल्याचा आरोप अंजलीच्या कुटुंबियांनी केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girl death due to snake bite at quarantine center in nainital uttarakhand