देशात ३१ जुलैपर्यंत निर्बंध कायम; पंतप्रधान आज संबोधित करणार

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 30 जून 2020

केंद्रीय गृहमंत्रालयाने रात्री दहाच्या सुमारास जारी केलेल्या या दिशानिर्देशानुसार दिल्ली आणि मुंबईसह कोरोना कहर कायम असलेल्या ‘कंटेनमेंट झोन’ भागांमध्ये ‘लॉकडाउन’चे नियम यापुढेही सक्तीने लागू राहतील.

नवी दिल्ली - देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा साडेपाच लाखांवर झेपावत असताना केंद्र सरकारने येत्या १ ते ३१ जुलै कालावधीसाठी ‘अनलॉक २’चे नियम - निर्देश जारी केले. केंद्रीय गृहमंत्रालयाने रात्री दहाच्या सुमारास जारी केलेल्या या दिशानिर्देशानुसार दिल्ली आणि मुंबईसह कोरोना कहर कायम असलेल्या ‘कंटेनमेंट झोन’ भागांमध्ये ‘लॉकडाउन’चे नियम यापुढेही सक्तीने लागू राहतील. सध्या सुरू असलेले कोणतेही उपक्रम सुरू करायचे असतील तर त्यासाठी त्या - त्या वेळी स्वतंत्र सूचना जारी करण्यात येतील. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शाळा महाविद्यालय आणि शिक्षण संस्था बंद राहणार असल्या तरी ऑनलाइन तासिका सुरू राहतील. लक्षावधी दिल्लीकरांची जीवनवाहिनी असलेली दिल्ली मेट्रो बंदच राहणार असली तरी या नियमाला जोडून ‘पुढील निर्देश येईपर्यंत’ अशी सावध सूचना लिहिलेली आहे. 

आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद राहणार आहे. मात्र गृह मंत्रालयाची परवानगी असलेली उड्डाणे सुरू राहतील. अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठीच्या वंदे भारत मिशनचा अपवाद करण्यात आला आहे. संचारबंदीची वेळ घटवून रात्री १० ते पहाटे ५ इतकी मर्यादित करण्यात आली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पंतप्रधान आज संबोधित करणार 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता. ३०) दुपारी चार वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली. ‘अनलॉक’ सुरू झाल्यापासून पंतप्रधान मोदी प्रथमच देशाला संबोधित करणार आहेत. 

हे सुरू राहणार : 
- ऑनलाइन शिक्षण 
- देशांतर्गत विमानसेवा 
- मर्यादित प्रवासी रेल्वे वाहतूक 
- केंद्र आणि राज्य सरकारांच्या प्रशिक्षण संस्था 
- विवाह समारंभ आणि अंत्यसंस्कारांसाठी ठरावीक उपस्थितीची यापुढेही कायम. 
- आंतरराज्य मालवाहतुकीचे नियम अधिक शिथिल 

हे बंदच राहणार 
- शाळा, महाविद्यालये, शिक्षणसंस्था. 
- आंतरराष्ट्रीय विमानसेवा. 
- दिल्लीसह इतर शहरांमधील मेट्रो. 
- धार्मिक सभा, समारंभ. 
- सुरू असलेल्या विशेष गाड्या वगळता रेल्वे प्रवासी वाहतूक. 
- चित्रपटगृहे, मॉल, 
- व्यायामशाळा, जिम, जलतरण तलाव. 
- सभागृहे, मनोरंजन पार्क, सार्वजनिक ठिकाणे. 
- सामाजिक, राजकीय सभा - समारंभ मेळावे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown rules will continue to be enforced in containment zone areas