Loco Pilot Leaves Train : ट्रेन अर्ध्यातच उभी करुन निघून गेला लोको पायलट; होळीच्या गर्दीत प्रवाशांना ३ तास सहन करावा लागला मनस्ताप

Train Stopped Midway India: पर्यायी लोको पायलट उपलब्ध नसल्यामुळे ट्रेन तब्बल तीन तास ठाकूरगंज स्टेशनवर अडकून पडली. नंतर दुसरा लोको पायलट आल्यावर ट्रेन रवाना करण्यात आली आणि काही प्रवाशांना इंटरसिटी एक्सप्रेसने पाठवण्यात आले.
Loco Pilot Leaves Train

Passengers waiting at Thakurganj railway station after a Malda–Siliguri DMU train was halted when the loco pilot ended duty hours

esakal

Updated on

Loco Pilot Leaves Train Midway: बिहारमधील किशनगंज जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली आहे. एका लोको पायलटने ड्युटी संपल्याचे कारण देऊ मध्येच ट्रेन थांबवली आणि निघून गेला. प्रवाशांना सुमारे तीन तास ट्रेन वाट पाहावी लागली. बुधवारी, पश्चिम बंगालमधील मालदा येथून सिलीगुडीला जाणारी डीएमयू ट्रेन क्रमांक ७५७१९ ठाकूरगंज रेल्वे स्थानकावर आली. लोको पायलटने त्यांची नऊ तासांची ड्युटी पूर्ण झाल्याचे सांगून ट्रेन थांबवली आणि निघून गेला. परिणामी, मालदा-सिलीगुडी डीएमयू ट्रेन तीन तास ठाकूरगंज येथे अडकून पडली. होळीच्या निमित्ताने ट्रेन बराच काळ थांबल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com