Loksabha Election 2024: मिथुन चक्रवर्ती विरुद्ध शत्रुघ्न सिन्हा... पश्चिम बंगालच्या लोकसभा या जागेवर दोन स्टार्समध्ये राजकीय संघर्ष?

Loksabha Election 2024: लोकसभा 2024 मध्ये पछ्चिम बंगाल मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे. पश्चिम बंगालमधील सर्वात हाय-प्रोफाइल जागांपैकी एक असलेल्या आसनसोलमध्ये दोन बॉलीवूड स्टार्समधील लढत आपण पाहू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024

Loksabha Election 2024: लोकसभा 2024 मध्ये पछ्चिम बंगाल मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे.  पश्चिम बंगालमधील सर्वात हाय-प्रोफाइल जागांपैकी एक असलेल्या आसनसोलमध्ये दोन बॉलीवूड स्टार्समधील लढत आपण पाहू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

पश्चिम बंगालमध्ये आसनसोलमध्ये तृणमूल काँग्रेसने पुन्हा एकदा बिहारी बाबू शत्रुघ्न सिन्हा यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र भाजपकडून त्यांचा सामाना करेल, हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. तृणमूल काँग्रेसकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी 2024 च्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शत्रुघ्न सिन्हा यांना उमेदवारी देण्याचा निर्णय टीएमसीने घेतल्याची जोरदार चर्चा आहे.

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम नेत्यांसोबत बंद दराआड याबाबत चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. आसनसोलमधून पुन्हा विजयाच्या आशेने शत्रुघ्न सिन्हा यांना टीएमसीकडून तिकीट देण्याची योजना आहे.शत्रुघ्न सिन्हा यांना प्रादेशिक नेते म्हणून ओळखले जावे, अशी येथील प्रत्येकाची अपेक्षा आहे.

2022 च्या पोटनिवडणुकीत शत्रुघ्न सिन्हा यांनी आसनसोलची जागा तीन लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकली होती हे लक्षात घ्यावे लागेल. यापूर्वी 2014 आणि 2019 मध्ये भाजपने विजय मिळवला होता. भाजपने अग्निमित्रा पॉल यांना 2022 च्या पोटनिवडणुकीत शत्रुघ्न सिन्हा यांच्या विरोधात उभे केले होते परंतु त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला.

Loksabha Election 2024
Sharad Pawar: पक्षाध्यक्ष हयात असताना राष्ट्रवादीचा निर्णय कसा झाला? विधानसभा अध्यक्ष काय निकाल देणार? जाणून घ्या कायदेतज्ज्ञांचे मत

भाजपकडून या नावांची चर्चा-

आसनसोलचे माजी महापौर जितेंद्र तिवारी हेही आसनसोल मतदारसंघातून भाजपचे लोकसभेचे उमेदवार असू शकतात. आसनसोलमध्ये बंगाली आणि बिगर बंगाली भाषिक मतदारांची संख्या जवळपास समान आहे. जितेंद्र तिवारी यांची हिंदी भाषिक मतदारांवर चांगली पकड आहे आणि आधी तृणमूलमध्ये असल्यामुळे भाजपला वाटते की ते तृणमूलची रणनीती चांगल्या प्रकारे समजू शकतात.  (Latest Marathi News)

मात्र, शत्रुघ्न सिन्हा यांना बड्या स्टार विरोधात उभे केले तर ही तुल्यबळ लढत होईल आणि भाजपला बाजी मारता येईल, अशीही चर्चा भाजपमध्ये सुरू आहे. अशा परिस्थितीत भाजपकडे  सुपरस्टार मिथुन चक्रवर्ती यांच्या रूपाने एक मोठा स्टार आहे आणि गेल्या वर्षी बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान मिथुन चक्रवर्ती यांनी जोरदार प्रचार केला होता.  दरम्यान शत्रुघ्न सिन्हा यांच्याविरोधात कोण निवडणूक लढवणार याचा निर्णय अद्याप भाजपने घेतलेला नाही.

Loksabha Election 2024
PM Modi :दुसऱ्या ‘भारत ऊर्जा सप्ताहा’चे उद्‍घाटन; ऊर्जा क्षेत्रात घडविणार क्रांती - पंतप्रधान नरेंद्र मोदी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com