Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

'जन की बात' या संस्थेने आपल्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला ३६२ ते ३९२ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केलाय तर इंडिया आघाडीला १४१ ते १६१ आणि इतरांना १० ते २० जागा मिळण्याचा अंदाज आहे.
Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी येणार आहेत. त्यापूर्वी शनिवार, दि. १ जून रोजी देशभरातील नामांकित संस्थांनी एक्झिट पोल दिले. त्यामध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं दिसून येत असून इंडिया आघाडी दीडशे ते दोशने जागांमध्ये यश मिळवेल, असा अंदाज पोल ऑफ पोलमधून दिसून येतोय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे चारशेपारचं स्वप्न बघितलं होतं, ते पूर्ण होताना दिसून येत नाही. परंतु एका संस्थेच्या एक्झिट पोलमधून भाजप नसलं तरी एनडीए चारशेपार होईल, असा अंदाज देण्यात आलेला आहे.

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?
West Bengal Exit Poll 2024 : ममतांच्या बंगालमध्ये भाजपचा डंका? महत्त्वाचे एक्झिट पोल काय सांगताएत?

इंडिया टीव्ही-सीएनएक्सने आपल्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला जास्तीत जास्त ४०१ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हा एकमेव पोल आहे ज्यात भाजपच्या चारशेपारच्या घोषणेला पूरक सर्व्हे आहे. सर्व्हेनुसार एनडीए ३७१ ते ४०१ जागा जागा, इंडिया आघाडीला १०९ ते १३१ तर इतरांच्या खात्यात २८ ते ३८ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

'जन की बात' या संस्थेने आपल्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला ३६२ ते ३९२ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केलाय तर इंडिया आघाडीला १४१ ते १६१ आणि इतरांना १० ते २० जागा मिळण्याचा अंदाज आहे.

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?
Modi 3.0: "जर मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले तर मी टक्कल करेन"; AAP च्या उमेदवाराचं आव्हान

काय म्हणाएत एक्झिट पोल?

सर्वेक्षण संस्था : एनडीए : इंडिया : इतर

एबीपी सी-व्होटर : ३५३-३८० : १६२-१८२ : ०४-१२

इंडिया न्यूज - डी डायनॅमिक्स : ३७१ : १२५ : ४७

रिपब्लिक भारत- पी मार्क : ३५९ : १५४ : ३०

रिपब्लिक भारत- मॅट्रिझ : ३५३-३६८ : ११८-१६१ : ४३-४८

टीव्ही ५ तेलुगू : ३५९ : १५४ : ३०

जन की बात : ३६२-३९२ : १४१-१६१ : १०-२०

न्यूज नेशन : ३४२-३७८ : १५३-१६९ : २१-२३

दैनिक भास्कर : २८१-३५० : १४५-२०१ : ३३-४९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com