नवी दिल्लीः वादग्रस्त विधानामुळे टीकेचे धनी ठरलेले इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला.
सॅम पित्रोदा यांनी एका इंग्रजी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, 'भारतात विविधता आहे. दक्षिण भारतातील लोक आफ्रिकन प्रमाणे दिसतात. पूर्वेकडील लोक चिनी लोकांसारखे दिसतात. पश्चिमेकडील अरबांसारखे, तर उत्तरेकडील लोक गोरवर्णीय दिसतात. आपण सर्व एकत्र राहतो. कारण, याचा आपल्याला काही फरक पडत नाही. आपल्यात एकी आहे.' त्यांच्या विधानानंतर देशभरातून टीका झाली.
दरम्यान, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी राजीनाम्यासंबंधीची माहिती देताना एक्सवर म्हटलं की, सॅम पित्रोदा यांनी आपल्या मर्जीने पक्षाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा स्वीकारल्याचंही रमेश यांनी सांगितलं.
पंतप्रधान मोदी यांनीही पित्रोदा यांच्या विधानाचा समाचार घेतला होता. ते म्हणाले की, मला आज कळालं की, काँग्रेस द्रौपती मूर्मू यांना राष्ट्रपतीपदासाठी का विरोध करत होतं. मूर्मू या आदिवासी कन्या आहेत. शहजादेचे अंकल जे अमिरेकमध्ये राहतात. त्यांनी यासंदर्भात रहस्य उजेडात आणलं आहे. शहजादा या थर्ड अंपायरकडून सल्ला घेतो. शहजादेचे हे फिलोसॉफर म्हणत आहेत की, ज्याच्या त्वचेचा रंग काळा असतो ते सर्व आफ्रिकी असतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.