Lok Sabha Election: AIMIMने केली लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा, औरंगाबादमधून इम्तियाज जलील तर...

Lok Sabha Election: ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) ने लोकसभा निवडणुकीसाठी 3 उमेदवार जाहीर केले आहेत. औरंगाबादमधून इम्तियाज जलील रिंगणात असतील.
Lok Sabha Election
Lok Sabha ElectionEsakal

Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणुकीच्या घोषणेनंतर ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) देखील सक्रिय झाली आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीसाठी पक्षाने तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. पक्षाध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांचाही यामध्ये समावेश आहे.

उमेदवारांच्या नावांची घोषणा करताना ओवेसी म्हणाले की, इम्तियाज जलील औरंगाबादमधून एआयएमआयएमचे उमेदवार असतील, तर अख्तरुल इमान किशनगंजमधून निवडणूक लढवतील. त्याचवेळी ओवेसी स्वतः हैदराबादमधून निवडणूक लढवणार आहेत.

ते पुढे म्हणाले की, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील उमेदवारांबाबत चर्चा करत आहेत, तेथे लवकरच उमेदवारांची नावे जाहीर केली जातील.

Lok Sabha Election
Electoral Bonds: 'प्रसिद्धीसाठी हे सुरु आहे, आणखी बोलायला लावू नका'; सरन्यायाधीशांनी बार असोसिएशनच्या अध्यक्षांना सुनावलं

AIMIM महाराष्ट्रात 6 जागांवर निवडणूक लढवणार

बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात एआयएमआयएमकडून पक्ष किती जागा लढवणार हे सध्या ओवेसींनी सांगितलेले नाही. याआधी सय्यद इम्तियाज जलील यांनी पक्ष महाराष्ट्रात 6 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, धुळे याशिवाय महाराष्ट्राच्या पूर्व भागातील विदर्भ मतदारसंघातून पक्ष आपले उमेदवार उभे करणार आहे.

Lok Sabha Election
Satyendra Jain: दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांचा तुरुंगवास निश्चित; तातडीनं आत्मसमर्पणाचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

AIMIM बिहारमध्ये 11 जागांवर निवडणूक लढवू शकते

ते म्हणाले की, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील उमेदवारांबाबत चर्चा करत आहेत, तेथे लवकरच उमेदवारांची नावे जाहीर केली जातील. याशिवाय बिहारमधील 11 जागांवर AIMIM आपले उमेदवार उभे करू शकते. याशिवाय उत्तर प्रदेशातही पक्ष यावेळी नशीब आजमावणार आहे.

इंडिया आघाडीचा ताण वाढला

बिहार आणि यूपीमध्ये निवडणूक लढवण्याच्या ओवेसींच्या घोषणेने इंडिया आघाडीत खळबळ उडाली आहे. तर ओवेसींचा उमेदवार निवडणुकीदरम्यान मुस्लिमांची मते कापू शकतो, असे मानले जात आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील औरंगाबादमधून विजयी झाले होते, तर ओवेसी हे हैदराबादचे खासदार आहेत. अख्तरुल इमान हे बिहार विधानसभेचे आमदार आहेत.

Lok Sabha Election
High Court Notice to Google: बाल्यावस्थेतील नग्न फोटोंवरुन गुगलनं घातला मोठा घोळ; हायकोर्टानं पाठवली नोटीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com