Rahul Gandhi: राहुल गांधी विरुद्ध 7 मंत्री... मोदी, शाह यांच्यासह मंत्री एकवटले, ओम बिर्लांवर देखील हल्लाबोल! आज संसदेत काय घडलं?

Rahul Gandhi criticizes BJP : अमित शाह यांनी राहुल गांधींना संसदेत नियम जाणून घेण्यासाठी ट्यूशन घेण्याचा सल्ला दिला. अमित शहा यांनीही उभे राहून राहुल गांधींच्या वक्तव्याला विरोध केला. विरोधी पक्षनेत्याने माफी मागावी, असे आवाहन त्यांनी केले.
Rahul Gandhi criticizes BJP
Rahul Gandhi criticizes BJP esakal

आज लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर अनेक गंभीर आरोप केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना अग्निवीर, NEET आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. त्यांनी भाजपावर द्वेष, हिंसा आणि खोटं पसरवण्याचा आरोप केला. त्यांच्या या आरोपांना प्रत्युत्तर म्हणून केंद्रातील मंत्री मंडळाने आपली बाजू मांडली.

हिंदू धर्मावरून वाद-

राहुल गांधींनी आपल्या भाषणात हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन धर्मांतील अहिंसेच्या शिकवणीचा उल्लेख केला. त्यांनी म्हटले की कोणताही धर्म हिंसा शिकवत नाही. त्यांच्या या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी नाराजी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी उभे राहिले. ते म्हणाले, "हा मुद्दा अतिशय गंभीर आहे. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे ही गंभीर बाब आहे." राहुल गांधी यांनीही पंतप्रधानांच्या या टिप्पणीला कडाडून विरोध करत ‘नरेंद्र मोदी हा संपूर्ण हिंदू समाज नाही, भाजप-आरएसएस हा पूर्ण हिंदू समाज नाही’, असे त्यांच्या विधानाचा बचाव करताना म्हटले.

अग्निवीर आणि राजनाथ सिंहांचे उत्तर-

राहुल गांधींनी अग्निवीरांच्या पेंशन आणि शहीद दर्जाबद्दल सरकारवर टीका केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या आरोपांचे खंडन केले आणि सांगितले की, अग्निवीर शहीद झाल्यास त्यांच्या कुटुंबाला एक कोटी रुपये देण्यात येतात. त्यांनी राहुल गांधींवर सदनाला चुकीची माहिती देण्याचा आरोप केला.

शेतकऱ्यांच्या MSP वर शिवराज चौहानांचे प्रत्युत्तर-

राहुल गांधींनी शेतकऱ्यांच्या MSP संदर्भात केलेल्या आरोपांचे खंडन करताना कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले की, उत्पादन खर्चावर 50 टक्के नफा जोडून शेतकऱ्यांना MSP दिली जात आहे. त्यांनी राहुल गांधींना त्यांच्या आरोपांची सत्यता तपासण्याचे आवाहन केले.

राहुल गांधींना ट्यूशनची सल्ला-

अमित शाह यांनी राहुल गांधींना संसदेत नियम जाणून घेण्यासाठी ट्यूशन घेण्याचा सल्ला दिला. अमित शहा यांनीही उभे राहून राहुल गांधींच्या वक्तव्याला विरोध केला. विरोधी पक्षनेत्याने माफी मागावी, असे आवाहन त्यांनी केले. अमित शहा म्हणाले, "इस्लाममधील अभय मुद्रावर त्यांनी एकदा इस्लामच्या अभ्यासकांचे मत घ्यावे. गुरु नानक साहिब यांच्या अभय मुद्रावर त्यांनी एकदा शीख संघटनेचे मत घ्यावे."

Rahul Gandhi criticizes BJP
Rahul Gandhi-Narendra Modi: राहुल गांधींनी PM नरेंद्र मोदींशी हस्तांदोलन केले,अन्... सभागृहात नेमकं काय घडलं?

राहुल गांधी पुन्हा सभागृहात उभे राहिले आणि म्हणाले, "हिंदू कधीही हिंसाचार पसरवू शकत नाहीत.  तुम्ही भगवान शिव यांचा फोटो पाहिल्यास, त्यांची प्रतिमा तुम्हाला दर्शवते की हिंदू भीती पसरवू शकत नाही, हिंसा पसरवू शकत नाही आणि हिंदू द्वेष पसरवू शकत नाही. पण भाजप 24 तास द्वेष-हिंसा, द्वेष-हिंसा करते."

राहुल गांधी यांनी लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांच्यावर देखील वैयक्तिक हल्ला केला. ते म्हणाले की, जेव्हा तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींशी हस्तांदोलन करता तेव्हा तुम्ही नतमस्तक होतात, पण जेव्हा तुम्ही मला भेटता तेव्हा तुम्ही छाती उंच करून उभे राहता. लोकसभा अध्यक्ष हा निःपक्षपाती असावा.

यावर सभापती ओम बिर्ला यांनी प्रत्युत्तर दिले की माझी मूल्ये शिकवतात की मोठ्यांसमोर नतमस्तक व्हावे आणि त्यांच्याशी बोलावे आणि समान वयाच्या लोकांना समान वागणूक द्यावी. पंतप्रधान हे सभागृहाचे नेते असतात. माझे संस्कार मला मोठ्यांसमोर नतमस्तक व्हायला आणि गरज पडल्यास त्यांच्या पायाला स्पर्श करून आदर दाखवायला शिकवतात.

Rahul Gandhi criticizes BJP
Rahul Gandhi Speech: हिंदूंवरील भाषणावरून लोकसभेत गदारोळ; राहुल गांधी नेमकं काय म्हणाले? हर हर महादेवचा जयघोष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com