Lok Sabha Special Session: लोकसभेचं २४ जूनपासून विशेष अधिवेशन, लोकसभा अध्यक्षांची होणार निवड

याच अधिवेशनात लोकसभा अध्यक्षांची देखील निवड केली जाणार आहे.
Lok Sabha election 2024
Lok Sabha election 2024 Sakal

नवी दिल्ली : केंद्र सरकारमधील मंत्रीपदं आणि खाते वाटप झाल्यानंतर आता येत्या २४ जूनपासून लोकसभेचं विशेष अधिवेशन सुरु होत आहे. याच अधिवेशनात लोकसभा अध्यक्षांची देखील निवड केली जाणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.

(Loksabha Special Session will be started from June 24 to 3 July Lok Sabha Speaker will be elected)

हे विषेश अधिवेशन ८ दिवस चालणार असून २४ आणि २५ जून रोजी नवनिर्वाचित संसद सदस्यांचा शपथविधी देखील सभागृहात पार पडेल. पण भाजपचा या अधिवेशनातील प्रमुख अजेंडा हा एनडीए सरकारच्या लोकसभा अध्यक्ष निवडीचा असेल. २४ जून ते ३ जुलै या काळात हे अधिवेशन चालणार आहे.

लोकसभा अध्यक्षपद हे एनडीएतील घटक पक्षांकडं जाईल अशी सध्या चर्चा सुरु आहे. यामध्ये टीडीपी किंवा जेडीयू या पक्षांच्या खासदाराकडं लोकसभा अध्यक्षपद जाईल अशी देखील चर्चा सुरु आहे. पण भाजपला हे पद इतर पक्षांना देण्याची इच्छा नाही. त्यामुळेच लोकसभा अध्यक्षपदासाठी भाजपच्या खासदार डी. पुरंदेश्वरी यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. डी पुरंदेश्वरी या भाजपत असल्या तरी टीडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्या मेहुणी आहेत.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला २४० जागा मिळाल्या, बहुमताइतक्या २७२ जागा मिळू शकल्या नाहीत. त्यामुळं केंद्र सरकारमध्ये भाजपची बाजू सध्या कमजोर आहे. कारण मित्रपक्षांच्या साथीशिवाय आणि स्वतंत्र विचारानं त्यांना सरकार चालवणं शक्य नाही. तसंच गेल्या दहा वर्षात विविध राज्यांमध्ये ज्या पद्धतीनं पक्षांतराच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये विधानसभा अध्यक्ष आणि लोकसभा अध्यक्ष यांचं पद अत्यंत महत्वाचं ठरलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com