ड्युटीवर गैरहजर, वादग्रस्त मालमत्तांची खरेदी; तक्रारीनंतर हेड कॉन्स्टेबलच्या निवासस्थानी छापा, सापडली कोट्यवधींची माया

Police Head Constable एका हेड कॉन्स्टेबलच्या निवासस्थानी छापा टाकला असता त्याच्याकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असल्याचं समोर आलंय. त्याच्याकडे तब्बल ६४ कोटींची मालमत्ता आढळून आलीय.
Police Head Constable

Police Head Constable

Esakal

Updated on: 

पोलीस प्रशिक्षण केंद्रात चालक पदावर कार्यरत असलेल्या एका हेड कॉन्स्टेबलच्या निवासस्थानी छापा टाकला असता त्याच्याकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असल्याचं समोर आलंय. इंदौरमध्ये लोकायुक्त पोलिसांच्या कारवाईत याचा खुलासा झाला आहे. फिरोज खान असं हेड कॉन्स्टेबलचं नाव आहे. त्यांना आतापर्यंत मिळालेल्या अधिकृत उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती असल्याचं छाप्यात आढळलं. कुटुंबिय, जवळचे सहकारी आणि त्यांच्या कंपन्यांच्या नावे ही मालमत्ता आहे. तब्बल ६४ कोटींची मालमत्ता आढळून आलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com