मध्य प्रदेशातील मुलीची सुखरूप घरवापसी | Tilak nagar police | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

missing girl

मध्य प्रदेशातील मुलीची सुखरूप घरवापसी

मुंबई : लोकमान्य टिळक रेल्वेस्थानकावर (Lokmanya tilak railway station) सापडलेल्या एका अल्पवयीन मुलीला (minor girl) सुखरूप तिच्या कुटुंबीयांकडे पोहोचवण्यात (missing girl reached home) टिळक नगर पोलीस ठाण्याच्या निर्भया पथकाला (Nirbhaya police cell) यश आले आहे.

हेही वाचा: NCB विरोधात काय म्हणालं हायकोर्ट? आर्यनच्या जामीन आदेशातील दहा प्रमुख मुद्दे

११ नोव्हेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनसवर एक अल्पवयीन मुलगी एकटीच बसलेली असून तिला मदतीची गरज असल्याचा वायरलेस मेसेज सकाळी ७.३० वाजता गस्तीवर असलेल्या टिळक नगर पोलिस ठाण्याच्या निर्भया पथकाला मिळाला. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक श्रद्धा पारसे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचल्या.

तिच्या चौकशीत ती मध्य प्रदेशातून गायिका बनण्यासाठी मुंबईत आल्याचे स्पष्ट झाले. त्यासाठी पंजाब मेलमधून ती मुंबईला पळून आली होती. मुलीकडून घरचा नंबर घेऊन त्यावर पोलिसांनी व्हिडीओ कॉल करून खात्री करून घेतली. त्यानंतर मध्य प्रदेशचे पोलिस तिच्या कुटुंबासह मुंबईत आले. टिळक नगर पोलिसांनी मुलीला त्यांच्याकडे सुपूर्द केले.

loading image
go to top