esakal | Loksabha 2019 : काँग्रेसला मतदान केल्याने भावाने केला गोळीबार
sakal

बोलून बातमी शोधा

bjp supporter allegedly shoots cousin for voting for congress

Loksabha 2019 : काँग्रेसला मतदान केल्याने भावाने केला गोळीबार

sakal_logo
By
वृत्तसंस्था

चंढीगड : काँग्रेसला मतदान केल्याच्या रागातून भाजप समर्थकाने चुलत भावावर गोळीबार केल्याची घटना झज्जर जिल्ह्यात घटली आहे. या गोळीबारात दोघेजण जखमी झाले असून, गोळीबारानंतर आरोपी फरार झाला आहे.

झज्जरमधील सिलाना गावात गोळीबाराची घटना घडली आहे. गावातील राजा हा काँग्रेस तर धर्मेंद्र हा भाजप समर्थक. राजा याला धर्मेंद्रने भाजपला मतदान करण्यास सांगितले होते. मात्र, राजाने स्पष्ट नकार दिला. यामुळे चिडलेल्या धर्मेंद्रने राजाच्या घरी जाऊन त्याच्यावर गोळाबार केला. यामध्ये राजा गंभीर जखमी झाला असून, राजाची आई किरकोळ जखमी झाली आहे. राजाला जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजाची आणि त्याच्या आईची प्रकृती स्थीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. धर्मेंद्रने गोळीबारानंतर पळून गेला असून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

loading image
go to top