Loksabha Election: 2019 च्या तुलनेत पहिल्या टप्प्यातील मतदानात 4 टक्क्यांनी घसरण, वाचा काय सांगते आकडेवारी

Voting Percent Of First Phase: यंदाच्या निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने जोरदार प्रयत्न केले आहेत. यासाठी त्यांनी 10 हून अधिक सेलिब्रिटींना राजदूतांची नियुक्ती केली आहे.
Voting Percent Of First Phase
Voting Percent Of First PhaseEsakal

यंदाच्या लोकसभा निवडणुकांसाठी नुकतेच पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. या पहिल्या टप्प्यात 2019 च्या लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानापेक्षा 4 टक्के कमी मतदान झाले आहे.

देशातील लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील 102 जागांवर 16 कोटी मतदारांनी मतदान केले. ज्याची टक्केवारी 65.5 इतकी होते. दरम्यान, 2019 मध्ये पहिल्या टप्प्यात 70 टक्के मतदान झाले होते.

त्यामुळे आता निवडणुकीच्या राहिलेल्या सहा टप्प्यांमध्ये जास्तीत जास्त मतदारांना मतदान करण्यास प्रवृत्त करण्याचे आव्हान निवडणूक आयोगासमोर आहे. (Voting Percent Of First Phase)

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पहिला टप्पा सामान्यपणे पुढेच्या टप्प्यांसाठी मार्गदर्शक मानला जातो. असे गेल्या दोन लोकसभा निवडणुकांतील आकडेवारीतून समोर आले आहे.

2019 मध्ये, पहिल्या टप्प्यात, सात टप्प्यातील निवडणुकांमध्ये सर्वाधिक 69.5% इतके मतदान झाले होते. त्याचप्रमाणे, नऊ टप्प्यातील 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सर्वाधिक म्हणजे 69% मतदान झाले होते. तेव्हा पुढील टप्प्यांमध्येही मतदानाची टक्केवारी वाढली होते.

या पॅटर्नमुळेच निवडणूक आयोगातील अधिकारी चिंतेत आहेत. कारण यंदा पहिल्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी घरल्याने यंदाही हाच पॅटर्न फॉलो होऊ शकतो.

यंदाच्या निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने जोरदार प्रयत्न केले आहेत. यासाठी त्यांनी 10 हून अधिक सेलिब्रिटींना राजदूतांची नियुक्ती केली आहे. तसेत आयपीएलमधील प्रेक्षकांमध्ये मतदानाविषयी जागरुकता निर्माण होण्यासाठी बीसीसीआयचीही मतद घेतली आहे.

Voting Percent Of First Phase
Sangli Lok Sabha : विशाल पाटील आमचे शत्रू नाहीत, पण..; वसंतदादांचा दाखला देत काय म्हणाले संजय राऊत?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 102 पैकी साधारण 10 जागा वगळता जवळपास सर्वच जागांवर मतदान कमी झाले आहे. EC अंदाज दर्शविते की पहिल्या टप्प्यातील मतदानात एकूण चार टक्क्यांनी घट झाली याचा अर्थ असा होईल की गेल्या वेळेच्या तुलनेत सुमारे 48 लाख नोंदणीकृत मतदार मतदानासाठी आले नाहीत.

Voting Percent Of First Phase
Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीत भाजपला किती जागा मिळतील? प्रसिद्ध अर्थतज्त्रांनी केलं भाकित

दरम्यान तामिळनाडूतील सर्व 39 जागांवर शुक्रवारी एकाच टप्प्यात मतदान पार पडले. मात्र, मागच्या निवडणुकीच्या तुलनेत तामिळनाडूतही मतदानाची टक्केवारी घसरली. 2019 मध्ये ती 72.44% इतकी होती ती यंदा 69.46% अशी आहे.

पाच जागांसह उत्तराखंडमध्ये 2019 मध्ये 61.88% मतदान झाले होते. ते यंदा घसरुन ५५.८९% टक्के झाले आहे.

शुक्रवारी 25 पैकी 12 जागांवर मतदान झालेल्या राजस्थानमध्ये मतदानात सहा टक्क्यांहून अधिक घट झाली. तेथे 2016 मध्ये पहिल्या टप्प्यात 64% मतदान झाले होते. ते यंदा 57.65% टक्क्यापर्यंत घसरले आहे.

शुक्रवारी झालेल्या पहिल्या टप्प्यात छत्तीसगडमधील एकमेव जागेवर शुक्रवारी मतदान झाले, बस्तर येथे मतदान 66.26% वरून 67.53% पर्यंत 1% नी वाढले. बस्तरमधील 56 गावांमध्ये पहिल्यांदाच डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी प्रभावाखाली मतदान घेण्यात आले. तर, मेघालयातील दोन जागांवरही मतदान 71% वरून 74% पर्यंत वाढले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com