
मुलांमध्ये कोविडचा प्रभाव दीर्घकाळ राहू शकतो ! कारण...
नवी दिल्ली : मोठ्यांप्रमाणे मुलांमध्येही कोविडचे काही लक्षणे दीर्घ काळापर्यंत राहू शकतात, असा दावा वैद्यकीय तज्ज्ञांनी केला आहे. तज्ज्ञ म्हणतात, की यात घाबरण्यासारखी कोणतीही बाब नाही. मात्र त्यांनी प्राथमिक अवस्थेतच उपचार करणे आवश्यक असल्याचे सांगितले. 'लॅन्सेट चाईल्ड अँड एडलसन्ट हेल्थ जर्नल' या नियतकालिकेत प्रकाशित एका संशोधनानुसार, सार्स सीओवी-२ विषाणूने संक्रमित मुलांमध्ये कमीत-कमी दोन महिन्यांपर्यंत कोविडचे (Covid) लक्षण राहू शकतात. (Long Covid In Children Akin To Adults, Know Why This)
हेही वाचा: विश्वासदर्शक ठरावासाठी तयार, लवकरच महाराष्ट्रात येऊ; शिंदे गटाचा दावा
१४ वर्षांपर्यंत मुलांमध्ये दीर्घकाळापर्यंत कोविडच्या प्रभावाच्या संबंधित डेन्मार्कमध्ये करण्यात आलेल्या संशोधनात हा निष्कर्ष समोर आला आहे. इंडियन स्पायनल इंजरीज सेंटरचे वरिष्ठ सल्लागार डाॅक्टर कर्नल विजय दत्ता म्हणतात, मुलांमध्ये दीर्घकाळापर्यंत कोविडच्या परिणामाविषयी अगोदरपासूनच माहिती उपलब्ध आहे. मोठ्यांप्रमाणे मुलांमध्ये ही श्वसनासंबंधी समस्यांव्यतिरिक्त वारंवार होणाऱ्या न्युमोनियाशी सामना करावा लागत आहे. या प्रकारे रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्याने डायरिया आणि वजन कमी होणे आदी समस्यांशी सामना करावा लागतो.
हेही वाचा: प्रवीण दरेकर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, राजकीय चर्चेला उधाण
डाॅ दत्ता म्हणाले, कोविड झालेल्या मुलांमध्ये या प्रकारच्या समस्या पाहायला मिळतात. फोर्टिस मेमोरियल रिसर्च इंस्टिट्यूटचे बाल विभागाचे प्रमुख डाॅ.कृष्ण चुग म्हणाले, की यात घाबरण्यासारखे काही नाही. लॅन्सेटच्या संशोधनाचा दाखला देत ते म्हणाले, मुलांचे तीन गटांमध्ये तीन वर्षांपेक्षा कमी, ४ ते ११ वर्ष आणि १२-१४ वर्ष यामध्ये संक्रमण होण्याचे स्पष्ट झाल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या महिन्यात कमीत-कमी एक लक्षण राहण्याची शक्यता असते. मात्र बहुतेक मुलांमध्ये सौम्य लक्षणेच असतात, असे डाॅ. चुग म्हणाले.
Web Title: Long Covid In Children Akin To Adults Know Why This
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..