'रिअल हिरो' कसा असतो ते व्हिडिओमधून पाहाच...

वृत्तसंस्था
Tuesday, 22 September 2020

दुचाकीवरून निघालेल्या युवकाने प्रसंगावधान राखून एका चिमुकल्याच्या मदतीला धावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटिझन्सनी त्याला 'रिअल हिरो' म्हटले आहे.

नवी दिल्लीः दुचाकीवरून निघालेल्या युवकाने प्रसंगावधान राखून एका चिमुकल्याच्या मदतीला धावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटिझन्सनी त्याला 'रिअल हिरो' म्हटले आहे.

मुलासाठी फाडले गर्भवती पत्नीचे पोट; मुलगाच जन्मला पण...

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. व्हायरल व्हिडिओमधून एका रात्रीत अनेकजण चर्चेत येत असतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहताना काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहात नाही. चित्रपट निर्माता निला मधाब पांडा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, उतारावरून प्रचंड वेगाने एका लहान मुलाचे वॉकर जात असते. दुचाकी चालकाच्या समोरून ते पुढे जाते. दुचाकीचालक प्रसंगावधान राखून दुचाकी थांबवतो आणि वॉकरच्या दिशेने पळ काढतो. खांद्यावरील बॅग पडल्यानंतरही तो चिमुकल्याला वाचविण्यासाठी पळतो. लहान मुलाला उचलून हातात घेतो. काही वेळातच एक महिला धावत येते आणि मुलाला उचलून घेते.

दरम्यान, दुचाकीचालकाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे या चिमुकल्याला वाचवण्यात यश आले आहे. रिअल हिरो अशी उपमा देऊन नेटिझन्स दुचाकीचालकाचे कौतुक करत आहेत. पण, संबंधित व्हिडिओ कोणत्या भागातील आहे, याबाबतची माहिती समजू शकलेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: look like real hero save child video viral