
मुलाच्या हव्यासापोटी एकाने आपल्या पत्नीचे पोट फाडून लिंग पाहण्याचा प्रयत्न केला होता. महिलेने मुलाला जन्म दिला पण मुलाचा पोटातच मृत्यू झाला आहे. महिलेची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बदायू (उत्तर प्रदेश): मुलाच्या हव्यासापोटी एकाने आपल्या पत्नीचे पोट फाडून लिंग पाहण्याचा प्रयत्न केला होता. महिलेने मुलाला जन्म दिला पण मुलाचा पोटातच मृत्यू झाला आहे. महिलेची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Video: सिगारेट ओढणारा खेकडा झाला व्हायरल
पत्नीच्या पोटातील बाळाचं लिंग पाहण्यासाठी पत्नीचे पोट फाडल्याच्या धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशात घडला होता. या घटनेनंतर देश हादरून गेला होता. गंभीर जखमी असलेल्या महिलेवर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. महिलेच्या पोटातून मृत मुलाला बाहेर काढण्यात आले आहे. शिवाय, महिलेवर दुसरी शस्त्रक्रिया करुन पोटाबाहेर आलेल्या आतड्यांना आतमध्ये टाकले आहे. महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्यांच्यावर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बायकोच्या आठवणीत लिहीले आठ किलोचे पत्र!
पन्नालाल आणि अनिता या दांपत्याला पाच मुली आहेत. पन्नालाल याला मुलगा हवा होता. अनिता या सहाव्यांदा गर्भवती राहिल्या होत्या. पण, गर्भात मुलगाच आहे का हे पाहण्यासाठी त्याने धारदार शस्त्राने पत्नीचे गर्भ फाडून लिंग पाहण्याचा प्रयत्न केला होता. रक्तस्त्राव झाल्यामुळे अनिता यांना उपचारासाठी बरेली येथे हलविल्यात आले होते. पुढील उपचारासाठी दिल्लीला हलविण्यात आले. पण, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अनिता यांचा भाऊ रवी म्हणाले, 'अनिता यांना पाच बाटल्या रक्त भरण्यात आले आहे. माझ्या बहिणीवर अत्याचार करणाऱया पन्नालाल याला फाशीची शिक्षा द्या. कारागृहात तो आरामात जगत असेल. पण, दुसरीकडे माझी बहिण मृत्युशी झुंज देत आहे. त्याच्या अपेक्षेप्रमाणे मुलगाच झाला पण तो मृत. त्याच्या पापाची शिक्षा त्याला मिळालीच पाहिजे.' दरम्यान, रवी यांनी पन्नालाल विरोधात गुन्हा दाखल केला असून, तो कारागृहात आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.