esakal | प्रेमी युगुलाला नग्न केले अन् बांधल्यावर मारत सुटले...
sakal

बोलून बातमी शोधा

love couple tied with pegs after naked in banswara rajasthan

प्रेमी युगुलाला नग्न केल्यानंतर त्यांना जनावरासारखे एका खुंटीला बांधण्यात आले. नग्नावस्थेत रात्रभर मारहाण करण्यात आली. शिवाय, त्यांची छायाचित्रेही व्हायरल केली. पोलिसांनी दुसऱया दिवशी त्यांची सुटका केली.

प्रेमी युगुलाला नग्न केले अन् बांधल्यावर मारत सुटले...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

जयपूर (राजस्थान): प्रेमी युगुलाला नग्न केल्यानंतर त्यांना जनावरासारखे एका खुंटीला बांधण्यात आले. नग्नावस्थेत रात्रभर मारहाण करण्यात आली. शिवाय, त्यांची छायाचित्रेही व्हायरल केली. पोलिसांनी दुसऱया दिवशी त्यांची सुटका केली.

नवरदेव मंगळसूत्र घालणार तेवढ्यात नवरी म्हणाली थांब...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक विवाहीत महिला आपल्या तीन महिन्यांच्या मुलाला सोबत घेऊन प्रियकरासोबत पळून गेली होती. सहा महिन्यानंतर त्यांना कपासन येथे पकडण्यात आले. दोघांना नग्न करून एका खुंटीला बांधले होते. रात्रभर त्यांना नग्नावस्थेतच मारहाण केली जात होती. शिवाय, दोघांची नग्नावस्थेतील छायाचित्रे काढली जात होती. दुसऱया दिवशी दुपारी याबाबतची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी सुटका केली. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

सहावीच्या विद्यार्थिनीचा मित्र आणि त्याचे दोन मित्र....

महिलेने सांगितले की, आम्हाला नग्न करून बांधण्यात आले होते. दोघांनाही रात्रभर बेदम मारहाण केली जात होती. अनेकजण मोबाईलमध्ये छायाचित्रे काढत होते. आम्हाला पाहण्यासाठी संपूर्ण वस्तीवरील नागरिक जमा झाले होते. परंतु, कोणीच सुटका केली नाही. दुसऱया दिवशी पोलिसांनी सुटका केली. पती, सासू, सासऱयांवर गुन्हा दाखल केला आहे.

मी, पत्नीवर खूप प्रेम करीत होतो पण...