प्रियकर म्हणाला प्रेयसीला दुध प्यायचा का अन्...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. परंतु, प्रेयसीचा विवाह करण्यासाठी मागे लागल्यामुळे प्रियकराने तिला भेटायला बोलावले. दुध पिणार का विचारले आणि दुधात विष घालून मारले. पोलिसांनी युवकाला अटक केली आहे.

रायपूर (छत्तीसगड): दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. परंतु, प्रेयसीचा विवाह करण्यासाठी मागे लागल्यामुळे प्रियकराने तिला भेटायला बोलावले. दुध पिणार का विचारले आणि दुधात विष घालून मारले. पोलिसांनी युवकाला अटक केली आहे.

तुझ्यावर खूप प्रेम करतोय; हो बोल म्हणाला अन्....

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिना (वय 19) व नीरज सेन (वय 25) यांचे प्रेमसंबंध होते. दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी खासगी नोकरी करत होते. रिना नोकरीनिमित्त रायपूरमध्ये राहात होती. नीरजचे रिनाच्या घरी जाणे-येणे होते. नीरजकडे विवाह करण्यासाठी रिना आग्रह धरत होती. यामुळे रिनाला मारण्याचा कट रचला. संध्याकाळी रिनाच्या घरी गेला होता. दोघांमध्ये पुन्हा विवाहाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. परंतु, नीरज विवाहास तयार होत नव्हता. निरजने रिनाला दुध पिणार का म्हणून विचारले. दुधामध्ये उंदीर मारण्याचे औषध टाकले आणि तिला प्यायला दिले. काही वेळातच रिनाला त्रास होऊ लागला. नीरजने तेथून पळ काढला. रिनाने आईला फोन करून माहिती दिली. नातेवाईकांनी तिला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

विद्यार्थ्यांसमोर शिक्षकाने घेतला बाईंचा 'किस'...

रिनाचा शवविच्छेदनाचा अहवाल हाती आल्यानंतर विष पाजून हत्या केल्याचे उघड झाले. पोलिसांनी नीरजला ताब्यात घेतल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली. त्याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

...अन् मिळाला पत्नीचाच 'पॉर्न' व्हिडिओ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lover killed his girlfriend give poison at raipur