
एका रुग्णालयात दोघांना नको त्या अवस्थेत रंगेहात पकडल्यानंतर दोघांना एकत्र बांधून चप्पलांचा हार गळ्यात घातला. शिवाय, दोघांचे लग्न लावून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना येथे घडली.
गिरीडीह (झारखंड): जिल्ह्यातील एका रुग्णालयात दोघांना नको त्या अवस्थेत रंगेहात पकडल्यानंतर दोघांना एकत्र बांधून चप्पलांचा हार गळ्यात घातला. शिवाय, दोघांचे लग्न लावून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना येथे घडली.
विवाहाचा विषय काढला की डॉक्टर पळून जातोय...
जिल्हा रुग्णालयामध्ये एक दांपत्य राहात आहे. संबंधित नागरिक रुग्णालयामध्ये कामाला आहे. परंतु, त्या व्यक्तीचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत. या कारणावरून दांपत्यामध्ये भांडणे होत होती. काही दिवसांपूर्वीच दोघांमध्ये भांडण झाल्यामुळे त्याची पत्नी माहेरी गेली होती. पत्नी माहेरी गेल्याची माहिती प्रेयसीला होती. कामावर असताना रात्री त्याची प्रेयसी रुग्णालयात आली. दोघांनी खोली बंद केल्याचे नागरिकांनी पाहिले. काही वेळानंतर नागरिकांनी दरवाजा तोडून खोलीत प्रवेश केला. दोघांना नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर मारहाण करत दोरीने बांधले. शिवाय, दोघांच्या गळ्यात चपलांचा हार घातला. दोघांना विवाह करण्यास भाग पाडले. या घटनेची माहिती पोलिसांना समजल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. दोघांना ताब्यात घेऊन ते चौकीत गेले.
प्रियकराच्या दुचाकीवर वहिनीला पाहिले अन्...
पोलिस अधिकारी अनिल कुमार यांनी सांगितले की, दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील चौकशी सुरू आहे.
युवक व महिलेने सांगितले की, आम्हाला या प्रकरणामध्ये गोवण्यात आले आहे. नागिरकांनी आम्हाला एकत्र आणून षडयंत्र रचले आहे. महिलेसोबत माझे कोणतेही संबंध नाहीत.