विवाहाचा विषय काढला की डॉक्टर पळून जातोय...

police registered complaint against a doctor at chhattisgarh
police registered complaint against a doctor at chhattisgarh

रायपूर (छत्तीसगड): रेल्वे प्रवासादरम्यान युवती आणि डॉक्टरची मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर आठ वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. युवतीने विवाहाची मागणी केल्यानंतर त्याने हात वर केले. युवतीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

सव्वीस वर्षीय युवतीने मोहन नगर पोलिस चौकीत डॉक्टर दीपक चौरासिया विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. युवतीने तक्रारीमध्ये म्हटले आहे की, 'नोकरीनिमित्त रेल्वे प्रवास करत होते. प्रवासादरम्यान दीपक सोबत मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दीपकने 2011 मध्ये विवाहाचा प्रस्ताव ठेवला. आम्ही दोघे एकत्र राहू लागलो. शिवाय, ठिकठिकाणी फिरू लागलो. 2011 पासून आमच्यात शारिरीक संबंध आले. पण, विवाहाची मागणी केल्यानंतर तो टाळू लागला. यानंतर तो दुसरीकडे राहायला गेला. त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. तुमचा दोघांचा प्रश्न असन, तुम्ही पाहून घ्या, असे म्हणून त्यांनीही हात वर केले. माझी फसवणूक झाल्यामुळे तक्रार दाखल करत आहे.'

पोलिसांनी सांगितले की, युवतीने तक्रार दाखल केली आहे. दीपक सध्या ओडिशामध्ये राहात असल्याची माहिती मिळाली. याबाबत पुढील तपास करत आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com