

Bay of Bengal Low Pressure Area Weather Update
esakal
Maharashtra Winter Forecast : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, त्याची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे सोमवारपर्यंत (ता. १६) मध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. दक्षिण अंदमान समुद्र परिसरात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे शुक्रवारी (ता. १३) आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. आज (ता. १४) त्याची तीव्रता आणखी वाढण्याचा अंदाज आहे. दरम्यान, आग्नेय अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळही समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे.