सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; जाणून घ्या LPG सिलिंडरचे दर

LPG-Gas
LPG-Gas
Summary

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे देशातील नागरिक त्रस्त आहेत. त्यातच बिगर सबसिडीच्या घरगुती एलपीजी (LPG) सिलिंडरच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे १ जूलैपासून नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे

LPG Latest Price July 2021: पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे देशातील नागरिक त्रस्त आहेत. त्यातच बिगर सबसिडीच्या घरगुती एलपीजी (LPG) सिलिंडरच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे १ जूलैपासून नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. १ जुलैपासून तुम्हाला सिलिंडर भरण्यासाठी २५ रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. मे आणि जून महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता.

एप्रिल महिन्यात एलपीजी सिलिंडरच्या किंमतीमध्ये १० रुपयांची घट करण्यात आली होती. मुंबईत एलपीजी सिलिंडरची किंमत ८३४.६ रुपये असणार आहे. १ जूनला हीच किंमत ८०९ रुपये होती. आज दिल्लीमध्ये LPG सिलिंडरच्या किंमती ८३४ रुपये आहे. दिल्लीमध्ये या वर्षी जानेवारीमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत ६९४ रुपये होती, जी फेब्रुवारीमध्ये वाढून ७१९ रुपये प्रति सिलिंडर करण्यात आली. १५ फेब्रुवारीला किंमत वाढवून ७६९ रुपये करण्यात आली होती. त्यानंतर २५ फेब्रुवारीला एलपीजी सिलिंडरची किंमत ७९४ रुपये करण्यात आली. मार्च महिन्यात एलपीजी सिलिंडरची किंमत ८१७ रुपये करण्यात आली. एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत सातत्याने वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय.

LPG-Gas
National Doctors Day: निस्वार्थ सेवेचा आदर्श ठेवणारे कर्मयोगी

१९ किलो सिलिंडरच्या किंमतीमध्येही वाढ

एक जूनला दिल्लीमध्ये १९ किलोच्या सिलिंडरच्या किंमतीमध्ये १२२ रुपयांची घट करण्यात आली होती. पण, या महिन्यात याच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. इंडियन ऑयलच्या वेबसाईटच्या माहितीनुसार दिल्लीमध्ये आता १९ किलोच्या सिलिंडरची किंमत १४७३.५ रुपयांवरुन वाढून १५५० करण्यात आली आहे. मुंबईमध्ये जून महिन्यात सिलिंडरची किंमत १४२२.५० रुपये होती, आता ती १५०७ रुपये झाली आहे. चैन्नईत १९ किलो सिलिंडरची किंमत १६८७.५ रुपये आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com