
एकीकडे रोज कोणत्या ना कोणत्या गोष्टीची किंमत वाढत आहेत. महागाई दिवसेंदिवस वाढत असतानाच गणेशाच्या आगमनानंतर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. एलपीजी गॅसच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. एलपीजी गॅसचे प्रति सिलिंडर दर 100 रुपयांनी कमी झाले आहेत. मात्र ही कपात केवळ व्यवसायिक गॅस सिलिंडरच्याच दरात करण्यात आली आहे. घरगुती वापराच्या 14.2 किलो गॅस सिलिंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किमती स्थिर आहेत. (LPG Gas Cylinder Price)
व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात जवळपास 100 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. तर नव्या दरानुसार आता राजधानी दिल्लीमध्ये एलपीजी गॅसचा दर प्रति सिलिंडर 1885 एवढा झाला आहे. तो पूर्वी 1976.50 रुपये इतका होता. कोलकतामध्ये कपातीनंतर गॅस सिलिंडरचे दर 1995.5 इतके झाले आहेत. पूर्वी ते 2095 रुपये इतके होते. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये नव्या दरानुसार एका व्यवसायिक गॅस सिलिंडरसाठी आता 1844 रुपये मोजावे लागणार आहेत.
व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात होण्याचा हा सलग दुसरा महिना आहे. याआधी ऑगस्टमध्ये देखील एलपीजी गॅसच्या दरात 36 रुपयांची कपात करण्यात आली होती. तर आज पुन्हा एकदा व्यवसायिक गॅस सिलिंडरचे दर 100 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.