

LPG cylinder theft
ESakal
पाटणा येथे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या नावाचा वापर करून एका गॅस एजन्सीकडून सिलिंडर खरेदी करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही व्यक्तींनी अधिकारी असल्याचे भासवून गॅस एजन्सीमधून चार एलपीजी सिलिंडर घेतल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या कार्यालयाने हा दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे सांगत या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.