LPG संपला, चपाती-भाकऱ्या भाजायच्या कशा? रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणात कपात; रुग्णांचे हाल

LPG Gas Shortage: लखनऊच्या किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीत रुग्णांना डाळ-भाजी आणि चार रोट्या मिळत होत्या. पण गॅसच्या संकटामुळे फक्त दोनच रोट्या दिल्या जात आहेत.
LPG Gas Shortage

Gas Crisis Hits Hospital Kitchens Rotis Reduced for Patients

Esakal

Updated on

Lucknow Hospital Cuts Meal Portions Amid LPG Shortage: आखाती युद्धामुळे भारतात गॅस टंचाईची परिस्थिती निर्माण झालीय. गॅस तुटवड्यामुळे हॉटेल व्यवसाय, उद्योगांना मोठा फटका बसत आहे. परिणामी यात सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत असल्याचं आता दिसून येत आहे. लखनऊच्या किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीत गॅस संकटामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. आतापर्यंत रुग्णांना डाळ-भाजी आणि चार रोट्या मिळत होत्या. पण गॅसच्या संकटामुळे फक्त दोनच रोट्या दिल्या जात आहेत. गॅस पुरवठा खंडित झाल्यानं किचन संचालकांनी रोट्यांच्या संख्येत कपात केलीय. त्याऐवजी भात दिला जात असला तरी रुग्णांनी तक्रारी केल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com