
नवी दिल्ली : बिहारमधील मतदारयाद्यांच्या फेरपडताळणीवरून (एसआयआर) विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची आज गोंधळातच सांगता झाली. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहात घोषणाबाजी, फलक झळकावून सुनियोजित अडथळे आणले जात असल्याचे विरोधकांना खडसावले. हा गोंधळ संसदेच्या प्रतिष्ठेला बाधा आणणारा असल्याची उद्विग्नता व्यक्त करताना त्यांनी सभागृहातील शिष्टाचार, परंपरांचे पालन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.